सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्माबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यामागे कोणताही विशिष्ट हेतू नव्हता, तर स्वतः तिलक वर्माची इच्छा होती की त्याने तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करावी. तिलक वर्माने पहिल्या दोन सामन्यात धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तो चौथ्या क्रमांकावर खेळत होता. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनची विकेट पडली. तेव्हा सूर्याने तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि त्याने शतक झळकावले आणि दाखवून दिले की आपण या क्रमांकावर जोरदार फलंदाजी करू शकतो.
दरम्यान, सेंच्युरियनमध्ये शतक झळकावणाऱ्या तिलक वर्माबाबत कर्णधार सूर्या म्हणाला, “तिलक वर्माबद्दल मी काय सांगू? दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर (गाकबेर्हा) तो माझ्या खोलीत आला होता, मला विचारले की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. मी त्याला सांगितले ठीक आहे, या सामन्यात तो फलंदाजी कर त्याचा आनंद घे. त्याने त्याला मिळालेल्या या संधीचा फायदा घेत त्याने जी कामगिरी केली, त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे”. तसेच तिलक वर्माच्या शानदार खेळी मुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या डावात फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 219 धावा केल्या. ज्यात तिलक वर्मा (107) आणि अभिषेक शर्मा (50) यांनी मोलाची कामगिरी केली. 220 धावांचा पाठलाग करताना यजमान संघाचे सातत्याने विकेट्स पडत राहिले. त्यामुळे संघाला या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आले नाही. संघाला केवळ 208 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. या विजयासह भारत आता मालिकेत 2-1 ने पुढे आहे.
हेही वाचा-
IND VS SA; भारतीय संघाने रचला इतिहास; टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ
अर्शदीपने बुमराह-भुवीचे रेकॉर्ड तोडले, असा चमत्कार करणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
IND vs SA; रोमांचक सामन्यात भारताचा 11 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी