---Advertisement---

तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियावर येणार ‘ती’ नकोशी वेळ?, दक्षिण आफ्रिका ठरणार का कारण

On: मंगळवार, जून 14, 2022 2:43 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामाना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत यजमान भारत २-०ने मागे आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे, तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

ही मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली तर भारतावर सात वर्षांनंतर प्रथमच घरच्या मैदानावर टी२० मालिका गमावण्याची वेळ येणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध २०१५मध्ये झालेल्या टी२० आणि वनडे मालिका भारताने गमावल्या होत्या. या मालिकांमध्ये एमएस धोनीने भारताचे नेतृत्व केले होते. यानंतर दक्षिण आफ्रिका भारतात कोणतीही मालिका जिंकलेला नाही.

कटक येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. हा सामना गमानल्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) मागील सात सामने जिंकण्यास अयशस्वी ठरला आहे. टी२० मालिका होण्याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दोन कसोटी सामने आणि तीन वनडे सामने गमावले आहेत.

भारत-दक्षिण आफ्रिका १७ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारत ९ आणि दक्षिण आफ्रिका ८ सामने जिंकला आहे.

डॉ. व्हायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर तिसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पुरक असणार आहे. या स्टेडियममध्ये आतापर्यंत दोन टी२० सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यात पहिली गोलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरणार आहे.

या खेळपट्टीवर टी२० सामन्यातील १२७ धावा ही सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर २०१९मध्ये शेवटचा सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३ विकेट्सने पराभूत केले होते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान थोडे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील दोन्ही टी२० सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) धावा करण्यात अपयशी ठरला होता. यामुळे त्याच्याजागी वेंकटेश अय्यर (Venktesh Iyar)याला सलामीसाठी खेळवले जाऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत. भारताची गोलंदाजीची मदार पुन्हा एकदा भुवेश्वर कुमारवर असणार आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात ४ षटकात ३.२० इकोनॉमी रेटने धावा देत ४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

INDvsSA : तिसऱ्या टी२०साठी भारतीय ‘प्लेईंग एलेव्हन’मध्ये होऊ शकतात ‘हे’ तीन बदल

Video: विशाखापट्टनममध्ये पोहोचली ‘टीम इंडिया’, खेळाडूंचे झाले जंगी स्वागत

‘कर्णधार’ पंत ऑन द फिल्ड निर्णय घेण्यात पडतोय कमी, दुसऱ्या टी२०तील ‘त्या’ चुकीमुळे नेहरा नाराज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---