आयपीएलनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकी यांच्यात मायदेशातील टी-२० मालिका खेळली जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. आता या मालिकेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी १८ सदस्यांच्या संघातील प्रत्येकाला एनसीएमध्ये फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकी यांच्यातील टी-२० मालिका ९ जून रोजी सुरू होणार आहे. त्याआधी ५ जून रोजी संघातील खेळाडूंना बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) उपस्थित राहावे लागणार आहे. एमसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि फिजियो नितीन पटेल यांच्या निदर्शनात सर्व खेळाडूंना स्वतःची फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. चाचणी पास केल्यानंतर संघ ७ जून रोजी दिल्लीसाठी रवाना होईल.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सर्व खेळाडू फिटनेस कॅम्पसाठी एनसीएमध्ये जमतील. हे यासाठी महत्वाचे आहे की, त्यांच्यातील अनेकजण लहान-सहान दुखापतीतून जात आहेत. हर्षलला अजूनही टाके लागलेले आहेत. अशात आम्हाला फक्त हे सुनिश्चित करायचे आहे की, आता सर्वकाही ठीक आहे.”
काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यात सहभागी होतील. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक असतील, पण आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार नियोजनात बदल होऊ शकतो.
“राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत उपस्थित राहायचे आहे. असा विचार होता की, तो इंग्लंडविरुद्धच्या संघासोबत दौरा करेल आणि लक्ष्मण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडेल, पण राहुल इंग्लंडला जाण्याआधी सर्व गोष्टी पाहू इच्छित आहे. आमच्याकडे अजून काही दिवस आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये दौऱ्याचे नियोजन स्पष्ट होईल.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जून ते १९ जून दरम्यान खेळली जाणार आहे. त्यानंतर भारताला आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळायचे आहेत. इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना १ जूनपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी भारतीय संघाला इंग्लंडमध्ये सराव सामना खेळायचा आहे. याच कारणास्तव भारतीय संघाला काही दिवस आधीच इंग्लंडसाठी रवाना व्हावे लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VELvsTRL। स्म्रीती मंधानाने घेतला दीप्ती शर्माचा कठीण झेल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’
कन्फर्म! पुढच्या हंगामात मुंबई करणार ‘या’ ४ खेळाडूंना ‘जय महाराष्ट्र?’
काय आहे राजस्थानविरुद्धचा मास्टरप्लॅन? वाचा काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस