दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. कर्णधाराच्या रूपात गुरुवारी (९ जून) पंतने भारतासाठी पहिला सामना खेळला, पण यामध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. असे असले, तरी दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ पंतच्या नेतृत्वाने प्रभावित झाला आहे. ग्रीम स्मिथच्या मते भारताला जरी या सामन्यात पराभव मिळाला असला, तरी कर्णधार पंत स्वतःच्या प्रदर्शनावर खुश असू शकतो.
भारताला पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने मात दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकी कर्णधार ग्रीम स्मिथने भारतीय कर्णधार रिषभ पंतचे कौतुक केले आहे. त्याने आठवण करून दिली की, आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना रिषभ पंतने काही चुकीचे निर्णय घेतले होते, ज्यामुळे तो खूप ट्रोल झाला होता. निर्णायच सामन्यात पंतने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे दिल्लीला प्लेऑफमध्ये संधी मिळाली नव्हती, पण स्मिथच्या मते कर्णधाराच्या रूपात रिषभ पंत (Rishabh Pant) आता खूप बदलला आहे.
पहिला टी-२० सामना झाल्यानंतर ग्रीम स्मिथ (Graeme Smith) म्हणाला की, “जेव्हा तुम्हा पराभूत होता, तेव्हा तुम्ही नेहमी कर्णधाराला दोष देता. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते, पण मला वाटते की, त्याच्या (रिषभ पंत) शेवटच्या सामन्यानंतर, जो आयपीएलमध्ये दिल्ली संघासाठी महत्वाचा होता, त्याठिकाणी त्याने काही कठीण आणि खराब निर्णय घेतले. त्यामुळे या सामन्यात मी त्याला कर्णधाराच्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक होतो.”
“पण मला वाटले की, त्याने प्रत्यक्षात चांगले प्रदर्शन केले. त्याने योग्य वेळी योग्य खेळाडूंना खेळवले. स्वतः खेळात पुढे राहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा दक्षिण आफ्रिका संघ दबावात होता, तेव्हा त्याने भुवनेश्वरला बोलावले, तो हर्षल पटेलकडे गेला. एकंदरीत पाहता त्याने योग्य निर्णय घेतले, पण तुमच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले पाहिजे. तुम्हाला योजनेनुसार काम करावे लागेल,” असे स्मिथ पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ जरी पराभूत झाला असला, तरी संघाचे प्रदर्शन मात्र चांगले राहिले. नाणेफेक गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले, पण भारतीय खेळाडूंना विस्फोटक फलंदाजी करत २११ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघासाठी हे लक्ष्य अवघड वाटत होते, पण रस्सी व्हॅन डर दुसेन (७५*) आणि डेविड मिलर (६४*) यांनी स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?
आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?