भारतीय संघाला पुढच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका संघासोबत मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. पाच सामन्यांची ही मालिका ९ जूनपासून सुरू होईल. भारतीय संघ या मालिकेसाठी ५ जूनला एकत्र जमणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकी संघ मात्र २ जूनलाच भारतात दाखल झाला आहे. या मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार आहे, पण तो सध्या विदेशात आहे, पण दक्षिण आफ्रिकी संघ मात्र आगामी मालिकेसाठी चांगलाच तयारीला लागला आहे.
आगामी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकी संघ भारतीय संघाच्या आधी एकत्र जमला असून त्यांनी सराव देखील सुरू केला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खेळाडूंच्या सरावाची माहिती सार्वजनिक केली आहे.
CAUTION ⚠️ #Proteas at work #INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gxtcsZFa0Z
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 3, 2022
रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतदरम्यान विश्रांतीवर असल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे, पण राहुल सध्या बहरीनमध्ये आहे. त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून या प्रवासाची माहिती दिली आहे. राहुलला प्रवास करण्याची आवड आहे आणि तो नेहमी प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. बहरीनमध्ये केल्यानंतर देखील त्याने असाच प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुलच्या या इंस्टाग्राम पोस्टवर युवा फलंदाज शुबमन गिलने मजेशीर कमेंट केली आहे. गिल म्हटला आहे की, “भाई तुला डान्स करताना आणि हसताना पाहून चांगले वाटले.”
https://www.instagram.com/reel/CeV2DaRB_j7/?utm_source=ig_web_copy_link
मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल त्याच्या जवळच्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बहरीनला गेला आहे. राहुलच्या मित्राचे नाव डेविड मथिआस आहे, जो सध्या बहरीनसाठी क्रिकेट खेळतो. डेविड मूळचा भारतीय वंशाचा असून कर्नाटक संघासाठी राहुलसोबत खेळला आहे. याच वेळी त्यांचात चांगली मैत्री झाली होती.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ जून रोजी कटकमध्ये. तिसरा सामना १४ जून रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. त्यानंतर चौथा सामना १७ जून रोजी राजकोट आणि पाचवा सामना १९ जूनला बेंगलोरमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हम करे तो साला कॅरेक्टर ढिला हैं’, असे म्हणत भारतीय क्रिकेटरचा इंग्लंडवर निशाणा
‘तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित केल्यावर दु:ख होते’, संघाची साथ सोडल्यानंतर हळहळला साहा
बाबो! IPLच्या एका सामन्याची किंमत होणार १०० कोटी? बनू शकते जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स प्रॉपर्टी