दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी (९ जून) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव मिळाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती, पण तरीदेखील दक्षिण आफ्रिका संघाने बाजी मारली. भारताचा सलामीवीर इशान किशनने या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले आणि संघाला चांगली सुरुवात दिली. याच पार्श्वभूमीवीर माजी दिग्गज गौतम गंभीरने इशानचे कौतुक केले.
नाणेफेक गमावल्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) याने ७६ धावा केल्या. यासाठी त्याला ४८ चेंडू खेळावे लागले. ११ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर त्याने या धावा केल्या. संघाचा दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मात्र २३ धावा करून बाद झाला. इशानने या सामन्यात ज्या पद्धतीने ताबडतोड फलंदाजी केली, गंभीरच्या मते याच कारणास्तव मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये त्याच्यासाठी सर्वात मोठी बोली लावली होती.
माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, “तो खतरनाक फलंदाज आहे. शक्यतो याच कारणास्तव मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल २०२२मध्ये एवढी मोठ्या किमतीत खरेदी केले होते. यावरून तुम्हाला समजते की, तो सलग १४ टी-२० सामने चांगल्या खेळपट्टीवर खेळून आला आहे. इशान किशनने याच अंदाजात फलंदाजी केली.” दरम्यान, मेगा लिलावात इशान सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यासाठी मुंबई संघाने १५.२५ कोटी रुपये खर्च केले होते.
चर्चेदरम्यान गंभीर असेही म्हणाला की, “सर्वात चांगली गोष्ट इशान किशनमध्ये जी दिसली ती म्हणजे शक्यतो इतर कोणता खेळाडू असता, तर एका षटकात २० धावा घेतल्यानंतर त्याने एक धाव घेण्याचा किंवा पुढच्या षटकात पुन्हा संधी घेण्याचा विचार केला असता, पण इशानला त्या २० धावांनाच २६ धावांमध्ये बदलायचे होते. ही त्या पद्धतीची फलंदाजी आहे, जी तुम्हाला टी-२० क्रिकेटमध्ये पाहायची असते. याला म्हणतात निस्वार्थी फलंदाजी.”
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने १९.१ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावार विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकत रोहित- विराटचा विक्रम मोडायला निघालेला बाबर आझम, अर्धशतकावरच मानावं लागलं समाधान
‘पहिला सामना हारूनही पंत खुश असेल’, दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचे गजब वक्तव्य
‘भावा आयपीएल संपलीये’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पंड्याने घेतली मिलरची फिरकी





