---Advertisement---

…तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल ठरू शकते विराट कोहलीच्या टी20 करिअरची अखेरची मॅच!

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत विराटची बॅट शांतच राहिली. स्पर्धेत ओपनिंग करताना किंग कोहली पूर्णपणे ‘फ्लॉप’ ठरला असून, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्यानं धावा केल्या नाहीत, तर हा त्याचा शेवटचा टी20 सामना ठरू शकतो! आम्ही असं का म्हणतोय, हे समजून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा.

टी20 विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. मात्र तो टी20 विश्वचषकात आपला फॉर्म कायम राखू शकला नाही. कोहलीनं या विश्वचषकात आतापर्यंत 7 डाव खेळले, ज्यामध्ये त्यानं केवळ 75 धावा केल्या आहेत. ही खराब कामगिरी त्याच्या टी20 क्रिकेटमधील भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते.

रिपोर्ट्सनुसार, या विश्वचषकानंतर विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना टी20 संघातून वगळलं जाऊ शकतं. तसेच यापुढे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची या फॉरमॅटसाठी निवड होणार नसल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. आता विराट कोहलीचा फॉर्म पाहता, त्याच्या बाबतीत हे खरं होऊ शकतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सध्या गौतम गंभीर हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार असल्याच्या चर्चा आहेत. वृत्तानुसार, गंभीर जर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तर त्याच्या टी20 संघात रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळणार नाही. त्यामुळे आता टी20 मध्ये विराट कोहलीसह इतर वरिष्ठ खेळाडूंचं भविष्य काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

विराट कोहलीने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 124 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 116 डावांमध्ये त्यानं 48.37 ची सरासरी आणि 137.20 च्या स्ट्राईक रेटनं 4112 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 37 अर्धशतकं निघाली असून, नाबाद 122 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार टी20 विश्वचषकाची फायनल, दीड महिन्यापूर्वीच झाली होती भविष्यवाणी!
कुठे पूजा…तर कुठे होम हवन! टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचे देव पाण्यात
“काहीही झालं तरी विजय…” फायनलपूर्वी आफ्रिकेचा कर्णधार मार्करमनं दिला टीम इंडियाला इशारा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---