भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता उभय संघांमधला तिसरा टी20 सामना आज म्हणजेच (बुधवार 13 नोव्हेंबर) रोजी सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर या बातमीद्वारे सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते जाणून घेऊयात.
मालिकेतील पहिल्या टी20 मध्ये टीम इंडियाने 61 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या टी20 मध्ये भारतीय संघ प्रथम खेळून केवळ 124 धावा करू शकला. मात्र, एके काळी सामना टीम इंडियाच्या हातात होता, मात्र सात विकेट्स बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी यांनी गमावलेला सामना जिंकून दिला.
भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या दोन टी20 सामन्यांमध्ये फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या टी20 मध्ये तो प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर असू शकतो. असे मानले जात आहे. मात्र, एक गोष्ट अशी आहे की भारतीय संघात दुसरा सलामीवीर नाही. अभिषेकला वगळले तर जितेश शर्मा किंवा तिलक वर्मा यांना डावाची सुरुवात करावी लागेल. पण हा चुकीचा निर्णय असू शकतो.
वेगवान गोलंदाजीतही बदल अपेक्षित आहेत. आवेश खानला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी यश दयाल किंवा विजयकुमार वैशाख यांना पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. संघाकडे आधीच अर्शदीप सिंगच्या रूपाने डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अशा स्थितीत यश दयालला संधी मिळण्याची फारशी आशा नाही.
तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, विजयकुमार वैशाख आणि अर्शदीप सिंग.
हेही वाचा-
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठा निर्णय, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
IND vs SA: तिसऱ्या टी20 मध्ये सेंच्युरियनची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
VIDEO: बाॅर्डर-गावसकर मालिकेपूर्वी भारतीय संघ पर्थच्या मैदानावर गाळतोय घाम