दक्षिण अफ्रिका आणि भारतीय संघातील कसोटी मालिकेची सुरू झाली आहे. २६ डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ भक्कम स्थितीत होता. भारतीय संघांचा सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) पहिल्या दिवशी पायचीत बाद झाला. पण यानंतर वाद निर्माण झाल्याचे दिसले. तिसऱ्या पंचांनी मयंकला बाद करार दिल्यामुळे चाहते निराश झाल्याचेही दिसले, तर मयंकने स्वतः देखील या निर्णयासंदर्भात निराशा व्यक्त केली.
पहिल्या दिवशी भारतीय संघाचे सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अगरवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघा सलामीवीरांनी ११७ धावांची भागीदारी केली. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi) याने डावाच्या ४१ व्या षटकात मयंकला पायचीत बाद करार देण्यासाठी अपील केले. त्यानंतर मयंकला बाद करार देण्यात आला. पण चाहत्यांनी या निर्णयानंतर निराशा व्यक्त केली.
चाहत्यांच्या मते, मयंक बाद नव्हता. अशात पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मयंक म्हणाला की, मी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, तर कारवाई झाली असती.
अधिक वाचा – इंग्लंडच्या संघाचा २०२१ मध्ये सर्वाधिक ‘डक’चा नकोसा विक्रम, पण ‘या’ ५ पठ्ठ्यांनी राखली लाज
तिसऱ्या पंचांच्या मते चेंडू स्टंपला स्पर्श करत होता, पण त्यांच्या या निर्णयामुळे कोणीच समाधानी दिसत नव्हते. मयंक म्हणाला की, त्याने पंचानी बाद निर्णय दिल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मला माझी बाजू मांडण्याची परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत तेथून निघू इच्छित होतो. अन्यथा मी पंचांच्या चुकीच्या यादीत सामील झालो असतो आणि माझी मॅच फी कापली जाऊ शकत होती.”
व्हिडिओ पाहा – करिअरच्या लास्ट बॉलवर फलंदाजांना त्रिफळाचित करणारे गोलंदाज ।
दरम्यान, मयंकने राहुलसोबत पहिल्या दिवशी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मयंकने १२३ चेंडूंचा सामना केला आणि ६० धावा केल्या. यामध्ये त्याच्या ९ चौकारांचा समावेश होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ९० षटाकंत तीन विकेट्सच्या नुकसानावर २७२ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
उन्मुक्त चंदनंतर आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर करत सोडला देश; आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट
Video: अजिंक्य रहाणे फलंदाजी करताना वारंवार करत होता ‘या’ मंत्राचा जप, कॅमेऱ्यात झाले कैद