भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील एकदिवसीय सामना मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. उभय संघातील या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचे तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील, असे अनेकांना वाटत होते, पण या सामन्यातही त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. राहुल त्रिपाठी, रजक पाटीदार आणि मुकेश कुमार या नावांचा समावेश या तिघांमध्ये आहे.
उभय संघातील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला होता, जो भारताने 10 धावांच्या अंतराने गमावला होता. त्यानंतर भारतीय संघ मालिकेत 1-0 अशा अंतराने मागे पडला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये खेळला गेला. रांचीमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरीही साधली. रांचीतील टी-20 सामन्यात शाहबाज अहमद (Shahabaz Ahmed) याने स्वतःचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि एक विकेटही नावावर केली. पण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघात अजूनही असे काही खेळाडू आहेत, जे आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत आहेत. त्या तिघांना तिसऱ्या वनडे सामन्यातही त्यांना पदार्पण करता आले नाही.
राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतील असा अंदाज बांधला जात होता. कारण शिखर धवन याच्या नेतृत्वातील संघात सध्या युवा खेळाडूंना अधिक संधी दिली गेली आहे. कर्णधार रोहित आणि वरिष्ठ खेळाडूंचा संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले आहेत. आफ्रिकी संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोईला बाहेर बसलून वॉशिंगटन सुंदर आणि शहबाज अहमद यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये गेतले गेले होते. राहुल, रजत आणि मुकेश यांना मात्र आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी निवडलेल्या दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन –
भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेविड मिलर (कर्णधार), जानेमन मलान, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, मार्को यान्सेन, ऍंंडीले फेलुक्वायो, ब्योर्न फॉर्च्युइन, लुंगी एनगिडी, एनरीच नोर्तजे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तब्बल 92 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर घडली ‘ती’ गोष्ट! 120 वर्षापूर्वी आफ्रिकेने केलेली सुरुवात
AUSvENG: किती चिडी गेम खेळणार ऑस्ट्रेलिया! ऍरॉन फिंचची थेट अंपायरला शिवीगाळ