---Advertisement---

IND vs SL: पहिल्या कसोटीत टीम इंडियाने जिंकला टॉस; पुजारा-रहाणेच्या जागेवर ‘या’ खेळाडूंना संधी

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 9:25 AM
Team-India
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून (४ मार्च) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Series) सुरूवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. कारण हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (100th Test) आहे. तो १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा १२ वा, तर जगातील एकूण ७१ वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे.

या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेऐवजी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच आर अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकी गोलंदाजांची जोडी पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर रिषभ पंत यष्टीरक्षकाची भूमीका सांभाळेल, तर अष्टपैलू जयंत यादवचीही अंतिम ११ जणांच्या संघात निवड झाली आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची वेगवान गोलंदाज म्हणून अंतिम ११ जणांमध्ये निवड झाली आहे.

त्याचबरोबर हा सामना श्रीलंकेसाठीही खास आहे. हा त्यांचा ३०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेने त्यांचे संघसंयोजन करताना अंतिम ११ जणांमध्ये ३ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ –

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमन्ने, पाथम निसंका, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला (यष्टीरक्षक), सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया, लहिरू कुमारा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीने केली रवी शास्त्रींची नक्कल, माजी प्रशिक्षकाने स्वत: शेअर केला मजेशीर व्हिडिओ

पुजारा-रहाणेला रिप्लेस करतील ‘हे’ खेळाडू? एकाला फक्त २ कसोटींचा अनुभव, पण आहे जबरदस्त लयीत

आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत झील देसाई, वैदेही चौधरी, समा सात्विका यांचे सहज विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---