श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघ रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या सामन्यासाठी आमनेसामने आले. पुन्हा एकदा कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सामना झाला आणि पुन्हा एकदा श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 240 धावा फलकावर लावल्या. कोलंबोच्या फिरकीपटूंसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली असली तरी डाव संपण्यापूर्वी श्रेयस अय्यरने आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले.
श्रेयस अय्यरने श्रीलंकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात अचून थ्रो फेकत संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. अर्शदीप सिंग डावातील 50 वे षटक टाकत होता आणि त्याच्या षटकातील पाचवा चेंडू कामिंदू मेंडिसने हवेत उंच खेळला. मग अय्यरने धावत जात डीप मिडविकेटवरून झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडूपासून दूर होता आणि त्यामुळे त्याने डाइव्ह मारली नाही. या संधीचा फायदा घेत श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या धावेसाठी धावले.
दुसरीकडे अय्यरने चटकन चेंडू पकडला आणि मेंडिस दुसऱ्या धावेसाठी धावत असल्याचे पाहून त्याने सुमारे 30 मीटर अंतरावरून स्टंपला लक्ष्य करत चेंडू फेकला. त्याचा थ्रो इतका वेगवान आणि अचूक होता की चेंडू थेट स्टंपला जाऊन धडकला. हे पाहून कर्णधार रोहित शर्माही अवाक् झाला, कारण त्यालाही अय्यरने इतक्या दुरून अचूक निशाणा साधला यावर विश्वास बसत नव्हता.
🎯 = 💯
Shreyas Iyer showcasing his brilliance on the field 👌
Watch #SLvIND 2nd ODI LIVE NOW on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/gF93azv4WW
— Sony LIV (@SonyLIV) August 4, 2024
मेंडिस-वेल्लालगेने डाव सांभाळला
सामन्याचा विचार केला तर कामिंदू मेंडिस 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने ड्युनिथ वेलालगेसह सातव्या विकेटसाठी 72 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली आणि 136 धावांत 6 विकेट गमावलेल्या संघाला 240 धावांपर्यंत पोहोचवले. मेंडिसशिवाय वेल्लालगेने झटपट 39 धावा केल्या. तर वरच्या फळीत अविष्का फर्नांडोनेही 40 धावांचे योगदान दिले. या डावात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवनेही 2 फलंदाजांना बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट बाद होता की नाबाद? डीआरएसवरून मोठा गोंधळ, श्रीलंकन खेळाडूंच्या प्रतिक्रियेनेही वेधले लक्ष
Video : रोहितचा थ्रो हुकला, पण विराटने चित्त्याप्रमाणे चपळता दाखवत श्रीलंकेच्या फलंदाजाला केले रनआऊट
“त्याला भारी वाटायचं जेव्हा मी…” फ्रेंडशिपडेच्या दिवशी धवनला आली जुन्या जोडीदाराची आठवण..!