Virat Kohli Run Out Video :- भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातील चपळतेसाठीही ओळखला जातो. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही विराटच्या चित्त्यासारख्या वेगवान क्षेत्ररक्षणाचे उदाहरण पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या षटकात विराट वेगाने धावत सुटला आणि बुद्धीचातुर्य दाखवत अकिला धनंजयला धावबाद केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विराटचे प्रयत्न पाहून कर्णधार रोहित शर्माच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. वयाच्या 35 व्या वर्षीही विराट फिटनेसचे नवे मापदंड सेट करताना दिसत आहे.
त्याचे झाले असे की, श्रीलंकेच्या डावादरम्यान अर्शदीप सिंग भारतासाठी शेवटचे षटक टाकत होता. श्रेयस अय्यरने षटकाच्या पाचव्या चेंडूवर कामिंदू मेंडिसला जोरदार थ्रो मारून धावबाद केले. एकीकडे पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरने शो चोरला, पण पुढच्याच चेंडूवर विराट चर्चेचा विषय ठरला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर जेफ्री वँडरसेन मिडऑफच्या दिशेने एक शॉट मारला, जिथे रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करत होता. वँडरसेनने एक धाव पूर्ण केली, पण रोहितच्या थ्रोने विकेट हुकली आणि चेंडू थेट विराटच्या हातात गेला. अशा स्थितीत वेंडरसे आणि धनंजय दुसरी धाव घेण्यासाठी धावले, पण त्यानंतर विराटनेही चेंडू हातात घेऊन चित्त्याच्या वेगाने स्टंपच्या दिशेने धाव घेतली आणि धनंजयला धावबाद केले.
— hiri_azam (@HiriAzam) August 4, 2024
विराटचे क्षेत्ररक्षण कौशल्य पाहून कर्णधार रोहित शर्माही आश्चर्यचकित झाला. या विकेटच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 240 धावांवर रोखले. विराट हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर आहेच, पण तो फलंदाजीत ऐतिहासिक विक्रम करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त 92 धावा दूर आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो ही कामगिरी करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली सध्या चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल
IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!