---Advertisement---

रिषभ पंत ‘गुरू’ धोनीच्या वाटेवर! विशेष सल्ला देत अश्विनला मिळवून दिली विकेट, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, मार्च 14, 2022 10:59 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने चांगले प्रदर्शन केले आहे आणि सध्या संघ भक्कम स्थितीत आहे. टी-२० मालिकेप्रमाणे श्रीलंकेला भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप (०-२) मिळू शकतो. दरम्यान दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात असे काही घडले, ज्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे चाहत्यांकडून कौतुक केल जात आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव उरकला. पहिल्या डावात श्रीलंका संघाची शेवटची विकेट रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला मिळाली. श्रीलंका संघाने विश्वा फर्नांडोच्या रूपात शेवटची विकेट गमावली. अश्विनच्या षटकात फर्नांडो खेळपट्टीवर उपस्थित होता आणि ओवरपिच चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यानंतर पंतने अश्विनला सल्ला दिला की, ‘हाच चेंडू पण थोडा मागे टाक.’

अश्विननेही तसेच केले आणि हा चेंडू फलंदाजाला मारता आला नाही. चेंडू बॅटच्या शेजारून रिषभ पंतच्या हातात गेला आणि पंतने अप्रतिम स्टंपिंगचा नमुना पेश केला. परिणामी फर्नांडोला विकेट गमवावी लागली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अश्विनमध्ये मैदानात झालेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फलंदाजीतही पंतचे महत्वाचे योगदान
पंतने फक्त यष्टीपाठी चांगली कामगिरी केली नाही, तर सामन्याच्या दुसऱ्या डावात अप्रतिम फलंदाजीही केली. कसोटी सामन्यात पंतची एकदिवसीय सामन्यासारखी खेळी चाहत्यांना पाहता आली. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० विकेट्स घेतल्या. तसेच पहिल्या डावात त्याने २६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या होत्या.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशी संपला. पहिल्या दिवशी भारताने २५२ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. त्यानंतर श्रीलंका संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर ३०३ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने एक विकेट गमावली आणि २८ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाची नवीन जर्सी लाँच; २८ मार्चला फुंकणार रणशिंग

INDvSL: क्लीन स्वीप देण्यापासून टीम इंडिया ९ बळी दूर; दुसरा दिवस रिषभ-श्रेयसच्या नावे

निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---