---Advertisement---

आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाची नवीन जर्सी लाँच; २८ मार्चला फुंकणार रणशिंग

On: सोमवार, मार्च 14, 2022 12:45 AM
Gujarat-Titans
---Advertisement---

आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा महाकुंभमेळा येत्या २६ मार्चपासून सुरू होत आहे. यापूर्वी अनेक संघांनी आपली नवीन जर्सी लाँच केली. यामध्ये आयपीएल २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाचाही समावेश आहे. गुजरात संघाने रविवारी (१३ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आपली नवीन जर्सी लाँच केली. यावेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही हजेरी लावली होती. गुजरातने जर्सी लाँच करण्याव्यतिरिक्त संघाचा लोगोदेखील लाँच केला. बीसीसीआय सचिव जय शाह आणि हार्दिक पंड्याने बजर दाबून जर्सी प्रेक्षकांसमोर ठेवली. गुजरात संघाची जर्सी निळ्या रंगाची आहे.

आयपीएल २०२२ ऑक्शनच्या काही दिवसांपूर्वी, अहमदाबाद आयपीएल फ्रँचायझीने त्यांच्या नावाचा खुलासा केला होता. तसेच, हार्दिक पंड्याव्यतिरिक्त (Hardik Pandya) राशिद खान (Rashid Khan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांना रिटेन केले होते. ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने लिलावात आपल्या संघात जबरदस्त खेळाडूंना घेण्याचा प्रयत्न केला होता. सीवीसी कॅपिटल्सने मागील वर्षी ५६२५ कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायझी विकत घेतली होती. गुजरातला आयपीएल २०२२मध्ये आपला पहिला सामना २८ मार्च रोजी वानखेडे येथे लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे.

https://twitter.com/gujarat_titans/status/1503034766224130048

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---