मार्च महिन्याअंती इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) शुभारंभ होणार आहे. २६ मार्च ते २९ मे दरम्यान भारतात आयपीएलचे सामने खेळले जाणार आहेत. या हंगामासाठी वेळापत्रकही जाहीर झाले आहे. मात्र या हंगामाची सुरुवाच होण्यापूर्वीच नव्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला मोठा धक्का बसला होता.
त्यांचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याने अचानक संपूर्ण हंगामातून माघार (Jason Roy Pulled Name Out Of IPL) घेतली होती. त्यामुळे गुजरातचा संघ त्याचा पर्यायी खेळाडूच्या शोधात होता. मात्र आता त्यांची ही डोकेदुखी दूर झाली असून त्यांना रॉयचा पर्यायी (Jason Roy Replacement) खेळाडू सापडला आहे.
गुजरात संघाने रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याला आपल्या संघासोबत जोडले आहे. गुरबाजदेखील रॉयप्रमाणेच सलामीवीर असून तो त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
जेसन रॉयने अचानक घेतली माघार
इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख सलामीवीर असलेल्या जेसन रॉयवर मेगा लिलावात प्रथमच आयपीएलमध्ये सामील होत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने २ कोटी रुपयांची बोली लावली होती. तो शुबमन गिलसह संघासाठी डावाची सुरुवात करेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, रॉयने २८ फेब्रुवारी रोजी आपण या हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, रॉय हा अधिक दिवस बायो-बबलमध्ये राहण्यासाठी उत्सुक नाही. याच कारणामुळे त्याने स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे.
हेही वाचा- PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो
गुरबाजची क्रिकेटमधील कामगिरी
रॉयच्या जागी गुजरात संघात संधी देण्यात आलेल्या गुरबाजने २०२१ सालच्या टी२० लीगमध्ये केवळ १४ चेंडूंमध्येच अर्धशतक ठोकले होते. दिल्ली बुल्स संघाकडून खेळताना तो १६ चेंडूंमध्ये ५७ धावा करत चर्चेत आला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, आतापर्यंत त्याने ९ वनडे आणि २० टी२० सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांमध्ये ५३.५० च्या सरासरीने त्याने ४२८ धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये २६.७० च्या सरासरीने ५३४ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ८७ धावा इतकी आहे.
तसेच तो लंका प्रीमियर लीग, पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळला आहे. यानंतर आता तो जगप्रसिद्ध आयपीएलमध्येही खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसके संघात ‘या’ खेळाडूची एन्ट्री, आयर्लंड संघाचा गोलंदाज नेट बाॅलरच्या रुपात टीममध्ये दाखल
मुलाखतीदरम्यान भावुक झाला रोहित; म्हणाला, ‘स्वप्नातही वाटलं नव्हतं कसोटी संघाचे नेतृत्त्व करेल’
टीम इंडियात पुनरागमन करणार हार्दिक? एनसीएमध्ये दाखल होण्याचे मिळाले आदेश