भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने उत्कृष्ट खेळ दाखवला. मात्र, आता यशस्वी जयस्वाल व भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा यांचा बातचीत करण्याचा एक व्हिडिओ समोर येत आहे.
पहिल्या सामन्यात यशस्वी याने केवळ 21 चेंडूंमध्ये 40 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर टेलिव्हिजनच्या माध्यमातून अजय जडेजा व आशिष नेहरा याच्याशी संवाद साधत असताना, त्याच्यासोबत एक मजेशीर घटना घडली.
नेहराच्या वक्तव्यामुळे सर्वांना हसू फुटले
नेहरा त्याचे कौतुक करताना म्हणाला, “तुला आता अजय जडेजा म्हणाले की, रोहित शर्मा व विराट कोहली तिथे असताना काय फरक असतो? त्यावर मला वाटते की, फरक एवढाच असतो जेव्हा ते दोघे असतात, तेव्हा तुला हे फटके नेट्समध्ये खेळावे लागतात.” त्याच्या या वक्तव्यामुळे सर्वांना हसू फुटले
Here’s Nehraji brightening up your feed with his laughter 🤣#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia | @ashishnehra64 pic.twitter.com/BVw6pyT2uu
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 28, 2024
विराट व रोहित यांनी टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सलामी दिली होती. यशस्वी त्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता यशस्वी हा शुबमन गिल याच्यासह नियमितपणे भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावत आहे.
पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या. पावसामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार 8 षटकांत 78 धावांचे आव्हान मिळाले. भारतीय संघाने हे आव्हान केवळ 6.3 षटकांत फक्त 3 गडी गमावून गाठले. तीन बळी घेणारा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई हा सामन्याचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल
“2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेटपटू जिंकणार सुवर्णपदक…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य
…तर ‘थाला’ आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार, लागू व्हायला पाहिजे हा खास नियम