बंगळुरू कसोटीत भारताने श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने आपल्या नावे केली. या मालिकेत श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत दोन्ही डावात अर्धशतके ठोकली आहेत. श्रेयस पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने दिवस-रात्र कसोटीत दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या डावात ९२, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तसेच, या सामन्यात आर अश्विनने देखील कपिल देव यांचा ४३५ धावांचा विक्रम मोडत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) त्याच्या कारकिर्दीतील ४ कसोटी सामन्यांमध्ये ७ डावात ५५.४३ च्या सरासरीने ३८८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या शानदार प्रदर्शनानंतर श्रेयस आणि आर अश्विनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहत्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अश्विनने सुद्धा रिट्वीट केला आहे.
388 runs at 55.42, 3 50s & 1 100. What a start has Shreyas Iyer had to his test career.
In a chat with @ashwinravi99 on #DRSwithAsh a year back, @ShreyasIyer15 opened up about his test cricket ambitions. We are glad he's been able to become a force in tests. Well done, Shreyas! pic.twitter.com/WbWYEkRudz
— Crikipidea (@crikipidea) March 14, 2022
आयपीएल २०२१ च्या सुरुवातीपूर्वी श्रेयस आणि अश्विन एका युट्यूब चॅनेलवर बोलले होते. यादरम्यान त्या दोघांनी आपली देशांतर्गत कामगिरी आणि विक्रमांबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. तोपर्यंत श्रेयसने भारतीय संघासाठी एकही कसोटी सामना खेळला नव्हता. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की, जेव्हा त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्याचा मुख्य उद्देश कसोटी क्रिकेट खेळणे हाच होता. त्याचे प्रथम श्रेणीतील कामगिरी सुद्धा शानदार आहे. त्याने आक्रमक फलंदाजी केली आहे, परंतु त्याला अजूनही संधी मिळालेली नाही.
तोपर्यंत पदार्पण केले नव्हते, परंतु फलंदाजाला धावबाद केले होते. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) टी२० मध्ये विराट कोहलीली दुखापत झाल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता आणि खेळाडूला धावबाद केले होते. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीतील श्रेयसची ती सर्वोत्तम विकेट होती.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली श्रेयसने २०२१ मध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पदार्पणाच्या सामन्यात शतक लगावले होते. त्यावेळी तो पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा १६ वा भारतीय बनला होता. त्यानंतर आता त्याला रहाणेच्या जागी श्रीलंका कसोटीत सुद्धा संधी मिळाली आणि त्याने दिवस-रात्र कसोटीत धडाकेबाज फलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
बिनधास्त ‘जड्डू’ची खुद्द कपिल देव यांनी थोपटली पाठ; म्हणाले, ‘मला त्याची खेळी आवडली, कारण…’
पराजय हा शब्दच विसरलीये टीम इंडिया, बंगळुरु कसोटी जिंकत लिहिलाय इतिहास
कुठून येतो हा कॉन्फिडन्स? IPL आणि PSL बाबत रमीज राजा यांचे वक्तव्य पाहून तुम्हीही असंच म्हणाल