भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोर फेरीतील चौथा सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) कोलंबोमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात अवघ्या 213 धावांवर गुंडाळला गेला. श्रीलंकनं संघासाठी गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले. विशेष म्हणझे ज्या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या, ते सर्वजण फिरकीपटू होते. याच कारणास्तव दोन्ही संघांसाठी मंगळवारच्या सामन्याचा पहिली इंनिंग विशेष ठरली.
भारताविरुद्धच्या सामन्यात दिमुथ वेललागे (Dunith Wellalage) याने 10 षटकांमध्ये 40 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे चरिथ असलंका याने या सामन्यात 9 षठकात 18 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. महिश थिक्षणा यालाही एक विकेट मिळाली. हे तिघेही फिरकीपटू गोलंदाज असून त्यांनी भारतीय फलंदाजांनी गुडघे टाकायला भाग पाडले. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारतासाठी 53 धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण दुसरा एखही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
दरम्यान, ही पहिली वेळ आहे, जेव्हा वनडे सामन्यात भारताचे सर्वच्या सर्व खेळाडूंना फिरकीपटू गोलंदाजांनी बाद केले आहे. तर श्रीलंकन संघालाही अशी कामगिरी इतिहासात दुसऱ्यांदाच जमली आहे, जेव्हा त्यांच्या फिरकीपटूंनी विरोधी संघाच्या सर्वच्या सर्व विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी 20001 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कोलंबोमध्येच श्रीलंकन फिरकीपटूंनी सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तब्बल 22 वर्षांच्या काळानंतर मंगळवारी (12 सप्टेंबर) श्रीलंकन संघआने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली. (IND vs SL In ODIs, this is the first time India have lost all 10 wickets to spinners in a single innings.)
सुपर-4मधील चौथ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंका संघ- पथूम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लागे, महीश थिक्षणा, कसुन रजिथा, मथीशा पथिराना
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहित सोडला तर अख्खा भारतीय संघ फेल! दुनिथ वेललागेने घेतलं विकेट्सचं पंचक
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी