भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल संघाचा चांगली सुरुवात देतील, अशी अपेक्षा होती. परंतु सामन्यातील दुसऱ्याच षटकात राहुल पवेलियनमध्ये परतला.
सामन्यातील दुसऱ्या षटकात महेशा थिक्शाना (Maheesh Theekshana) गोलंदाजीसाठी आला होता. त्याने या षटकातील पाचव्या चेंडूवर केएल राहुल () पायचित झाला. राहुलने या सामन्यात 6 चेंडू खेळले आणि एका चौकाराच्या मदतीने 7 धावा करून बाद झाला. राहुलनंतर फलंदाजीसाठी आलेला दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती, परंतु त्याला स्वतःचे खातेही खोलता आले नाही. राहुल आणि विराट स्वस्तात बाद झाल्यामुळे संघाच्या अडचणी नक्कीच वाढल्या.
बातमी अपडेच होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धोनीबद्दलच्या वक्तव्यानंतर आता विराटची इंस्टा स्टोरी चर्चेत! पाहा काय लिहिले
रोहितचं नशीब गंडलंय! श्रीलंकेने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग 11
जेमिमा रॉड्रिग्ज बिग बॅश लीग खेळणार! ‘या’ संघासोबत केला करार