भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन संघांमध्ये बॅंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसरी आणि शेवटची कसोटी मालिका सुरु झाली आहे. ही मालिका दिवस-रात्र कसोटी असणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अगरवाल फलंदाजीसाठी आले. भारताला मोठा झटका सुद्धा लागला. मयंक अगरवाल या सामन्यात ४ धावा करुन बाद झाला. त्याच्या बाद होण्यात बराच गोंधळ झालेला पाहायला मिळाला
https://twitter.com/AYUSHPA46545443/status/1502567385248661506?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502567385248661506%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fphoto%2Fmayank-agarwal-run-out-ind-vs-sl-pink-ball-test-rohit-sharma-no-ball-confusion-tspo-1427440-2022-03-12
श्रीलंकाच्या फलंदाजीच्या दूसऱ्या षटकात विश्वा फर्नांडो गोलंदाजी करत होता. मयंक अगरवाल क्रिजवर होता. दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू मयंक खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो चेंडू त्याच्या पायावर लागला असे वाटल्याने श्रीलंकेच्या खेळाडूंनी पायचीतसाठी अपील केले. पण, त्यावर पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. त्यावेळी लगेचच मयंकने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला असलेला रोहित पळालाच नाही. त्याचवेळी प्रवीण जयविक्रमाने चेंडू श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशान डिकवेल्लाकडे फेकला. डिकवेल्लानेही डीआरएस रिव्ह्यू घेण्यास सांगून चेंडू स्टंपला लावला. तोपर्यंत मयंक परत क्रिजमध्ये येऊ शकला नाही. त्यामुळे मयंक धावबाद झाला.
विशेष म्हणजे हा चेंडू पंचांनी नो बॉल दिला होता. पण नियमांनुसार नो बाॅलवर फलंदाजाला धावबाद करता येत असल्याने मयंकला माघारी फिरावे लागले. तसेच मयंक धावबाद झाल्याने श्रीलंकेने घेतलेल्या डीआरएस रिव्ह्यूचा काही उपयोग झाला नाही.
भारत आणि श्रीलंकेच्या दुसऱ्या कसोटीत अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे, तसेच जयंत यादवला संघातून बाहेर करण्यात आले आहे. मयंकला मागच्या काही सामन्यांमध्ये अपयश आले आहे. मोहाली कसोटीमध्ये त्याने ३३ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने तिन कसोटीत एकच अर्धशतक लगावले होते.
भारताची प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर,रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या
सहावी ओव्हर, सहावा चेंडू, रोहितचा षटकार अन् दर्शकाचं नाक; थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल
Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय
भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीतून श्रीलंकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू झाले बाहेर, ‘हे’ आहे कारण