श्रीलंका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (30 जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना देखील पल्लेकेले येथेच खेळला जाईल.
टीम इंडियानं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भारताकडे सध्या 2-0 अशी अभेद्य आघाडी आहे. अशा परिस्थितीत आता कर्णधार सूर्यकुमार यादवचं लक्ष्य तिसरा टी20 सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याकडे असेल. दुसरीकडे, यजमान श्रीलंकेचा संघ कसा तरी पुनरागमन करू इच्छितो, जेणेकरून ते मायदेशात लाजिरवाणा पराभव टाळू शकतील आणि आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आत्मविश्वास वाढवू शकतील.
श्रीलंकेत सध्या सतत पाऊस पडत आहे. पल्लेकेलेमध्येही पावसाळी वातावरण असून त्याचा परिणाम दुसऱ्या टी20 मध्ये दिसून आला होता. पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि त्यानंतर भारताच्या डावात फक्त 8 षटकं टाकली गेली. अशा परिस्थितीत आता तिसऱ्या सामन्यात देखील पाऊस पुन्हा खोळंबा घालणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला आजचं हवामान अपडेट देतो.
30 जुलै रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामन्यातही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. हवामान अहवालानुसार, सामन्यादरम्यान पावसाची 23 टक्के शक्यता आहे. त्याच वेळी, आकाश मोठ्या प्रमाणात ढगाळ राहील, तर तापमान 22 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय वारे 33 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहू शकतात. अशा स्थितीत फलंदाजांनी वाऱ्याच्या दिशेला लक्ष्य करून शॉट्स खेळले तर त्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. यामुळे गोलंदाजांना मात्र जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील टी20 मालिका आज संपणार आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहेत. 2 ऑगस्टपासून कोलंबो येथे 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा –
‘या’ दिग्गज खेळाडूच्या रुपात भारतीय संघाला मिळणार नवा गोलंदाजी प्रशिक्षक?
आशिया चषकातील चुकांमधून शिका! मिताली राजने भारतीय संघाला सांगितली आगामी विश्वचषकाची रणनिती
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा