भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना (India vs Sri Lanka, T20I Series) गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील पुढचे दोन सामने धरमशालामध्ये खेळले जातील. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत महत्वाची भूमिका पार पाडलेले सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार नाहीत, तर दुसरीकडे अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी संघात पुनरागमन केले आहे. अशात श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या (team India) प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू दिसतील, हा एक अवघड प्रश्न बनला आहे.
दिग्गज फलंदाज विराट कोहली, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर यांना आधीच या संपूर्ण टी-२० मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. अशात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सलामीवीर फलंदाजाच्या रूपात ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या युवा फलंदाजांना संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात संजू सॅमसनचा पर्यंय संघाकडे आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वतः येऊ शकतो.
‘हे’ खेळाडू पार पाडतील फिनिशरची भूमिका
पाचव्या क्रमांकावर युवा फलंदाज श्रेयस अय्यर संघाच्या मध्यक्रमाला बळकटी देईल, तर अष्टपैलू वेंकटेश अय्यर पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. वेंकटेश आणि रवींद्र जडेजा संघासाठी फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात.
असे असेल गोलंदाजी आक्रमण
वेगावान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार संघासाठी पहिल्या टप्प्यात गोलंदाजीसाठी येऊ शकतात. त्यानंतर मधल्या टप्प्यातील षटके हर्षल पटेल टाकू शकतो. फिरकी गोलंदाजाच्या रूपात जडेजा आणि युजवेंद्र चहल ही जोडी चांगली कामगिरी करू शकते. तसेच वेंकटेश अय्यरलाही एक किंवा दोन षटके टाकण्याची संधी मिळू शकते.
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० साठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन –
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या –
द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी
आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
सेमी फायनल २: दबंग दिल्लीपुढे बंगळुरू बुल्सचे नामोहरम, अंतिम सामन्यात पटणा पायरेट्सचे असेल आव्हान