वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील टी-२० आणि कसोटी मालिका खेळायची आहे (India vs Sri Lanka t20 series). टी-२० मालिकेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होणार आहे. पहिला सामना लखनऊमध्ये खळला जाणार असून भारतीय संघाने सरावाला सुरुवातही केली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याने एक सोशल मीडिया पोस्ट केली. या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) हिने त्याला ट्रोल केले आहे.
टी-२० मालिकेपूर्वी मंगळवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय संघाचे सराव सत्र पार पडले. सराव सत्रात रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह यांच्यासह इतरही खेळाडूंनी घाम गाळला. रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सराव सत्रातील फोटो शेअर केले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कर्णधाराने लिहिले की, “आता श्रीलंकेची वेळ आहे.”
रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण त्याची पत्ती रितिकाने केलेल्या एका कमेंटची खास चर्चा होत आहे. रितिकाने कमेंटमध्ये लिहिले की, “हो-हो, हे सगळं छान आहे, पण तू मला परत फोन करू शकतो का?” चाहते या दोघांमधील जुगलबंदीचा आनंद घेत आहेत.
https://www.instagram.com/p/CaSIkUloXEv/?utm_source=ig_web_copy_link







