भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले आणि सलग तिसरा विजय मिळवला. जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप (३-०) दिला. दरम्यान शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एका प्रसंगी रौद्र अवतारात दिसला होता, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या डावाच्या १६ व्या षटकात रोहित शर्मा रागावल्याचे पाहायला मिळाले. या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. षटकातील पाचवा चेंडू हर्षलने साधारणतः १३१ किलोमीटरच्या ताशी वेगाने टाकला होता, पण यष्टीरक्षक फलंदाज सजू सॅमसनला (Sanju Samson) त्याचा अंदाज नीट आला नाही. परिणामी सॅमसनच्या हातातून चेंडू निसटला आणि थेट सीमारेषेपार जाऊन पोहोचला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा सॅमसनवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
https://twitter.com/addicric/status/1497952048897138689
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतही रोहित शर्माचा असाच रौद्र अवतार पाहायला मिळालेला. मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता आणि स्वतःच्याच गोलंदाजीवेळी त्याने एक महत्वाचा झेल सोडला. भुवनेश्वरची ही चूक पाहून रोहित एवढा रागावला होता, की त्याने मैदानात खाली पडलेल्या चेंडूला लाथ मारली होती.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील या टी-२० सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला ५ विकेट्सच्या नुकसनावार १४६ धावासंखेपर्यंत रोखले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १४७ धावांचे लक्ष्य चार विकेट्सच्या नुकसनावर आणि १६.५ षटकांमध्ये गाठले. टी-२० मालिकेनंतर आता उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेचा पहिला सामना ४ फेब्रुवारीपासून मोहालीमध्ये, तर दुसरा सामना ११ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवाला दुहेरी मुकुट
श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज रोहित शर्माचा पिच्छा काही सोडेना; तब्बल ६ वेळा दाखवलाय तंबूचा रस्ता






