Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवाला दुहेरी मुकुट

मुलींच्या गटात ओडिशाच्या आहान हिला एकेरीचे विजेतेपद

February 27, 2022
in टेनिस
Boys-and-Girls-Singles-winner-Tavish-Pahwa-and-Aahan-with-chief-guest.

Photo Courtesy: File Photo


मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलींच्या गटात ओडिशाच्या आहान हिने एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले.

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या तविश पाहवा याने दुसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या फजल अली मीरचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तविश हा फरिदाबाद येथे शिव नादर शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून एन-कोर टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक मणिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने याआधी जानेवारी महिन्यात हरियाणा, कर्नाळ येथील 12वर्षाखालील राष्ट्रीय सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. काल दुहेरीत तविश पाहवाने तक्षम सैनीच्या साथीत प्रणित चिट्टीपुदोरागरी व फझल अली मीरयांचा 6-4, 1-6, 10-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहान हिने हरियाणाच्या अव्वल मानांकित आनंदिता उपाध्यायचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 12 वर्षीय आहान ही भुवनेश्वर येथे सेंट झेवियर हायस्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून एस बेस टेनिस अकादमीत प्रशिक्षक अजय निशांक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने याआधी जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात हरियाणा, कर्नाळ येथील 12वर्षाखालील राष्ट्रीय सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.

स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्यांना 200एआयटीए गुण, करंडक, प्रशस्तीपत्रक, तर उपविजेत्या खेळाडूंना 150एआयटीए गुण, करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक व एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
एकेरी: अंतिम फेरी:
मुले: तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.फजल अली मीर(तामिळनाडू)[2]6-2, 6-2;
मुली: आहान(ओडिशा)[2]वि.वि.आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] 6-4, 6-1.

महत्त्वाच्या बातम्या – 

डेक्कन जिमखाना व पीएमडीटीए तर्फे महिलांसाठी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे ८ मार्च रोजी आयोजन

‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर

श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना


Next Post
North-East-United

आयएसएल: ईस्ट बंगालसह नॉर्थ ईस्ट युनायटेडमध्ये शेवटचे स्थान टाळण्यासाठी स्पर्धा

Carmelo-Hayes-And-Hardik-Pandya

सेम टू सेम; हार्दिकसारखा दिसणारा 'हा' व्यक्ती आहे तरी कोण? स्वत:च ट्वीट करत मानले पंड्याचे आभार

Vinod-Kambli

मोठी बातमी.! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक; प्रकरण भलतंच गंभीर, वाचा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143