श्रीलंकेविरुद्ध रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात (India vs Sri Lanka 3rd T20I) भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर संघाने मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या शेवटच्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी नव्हता, पण तरीही तो चर्चेचा विषय बनला आहे. चहलच्या चर्चेचे कारण आहे, त्याचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी केली. भारताच्या डावाची सुरुवात झाली, तेव्हा चहल डगआउटमध्ये बसून सामन्याचा आणि धरमशालामधील थंड वातावरणाचा आनंद घेत होता. दरम्यान, डगआउटमध्ये बसलेल्या चहलने मध्येच उठून ‘टॉवेल डान्स’ सुरू केला, ज्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
चहल नेहमीच त्याच्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला गेला आहे, अशात रविवारी त्याच्या याच स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय झाला आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसत आहे. प्लेइंग इलेव्हनमधून चहलला बाहेर ठेवण्यामागचे कारण कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. त्याने त्याला विश्रांती दिल्याचे सांगितले होते.
Chahal Being Chahal
#INDvSL pic.twitter.com/XryDHncGxF— 𝕄𝕌𝕂𝔼𝕊ℍ (@bihari_baua) February 27, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५ विकेट्सच्या नुकसनावार १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष चार विकेट्सच्या नुकसनावार आणि १६.५ षटकात गाठले. मालितील भारतीय संघाने मिळवेला हा सलग तिसरा विजय असल्यामुळे श्रीलंकेला ३-० असा क्लीन स्वीप मिळाला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारताने मिळवलेला हा सलग १२ वा विजय आहे.
भारतासाठी श्रेयस अय्यरने (४५ चेंडूत नाबाद ७३ धावा) मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ठोकले आणि सामनावीर ठरला. सोबतच मालिकेत केलेल्या प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीरदेखील निवडले गेले. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये श्रेयसने नाबाद अर्धशतके ठोकली आहेत आणि एकूण २०४ धावा केल्या. दुसरीकडे श्रीलंकेसाठी त्यांचा कर्णधार दसुन शनकाने ३८ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या परंतु, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
चार टी२० सामने, जेव्हा भारतीय यष्टीरक्षक बनले ‘सामनावीर’; पण धोनीचे मात्र नाव नाही
टीम इंडियाच्या ‘या’ तीन खेळाडूंचं दिनेश कार्तिकने केलं कौतुक; म्हणाला, ‘शोधापेक्षा कमी नाहीत…’
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काय होती श्रेयस अय्यरची रणनीती? वाचा काय म्हणाला ‘मॅन ऑफ द मॅच’