भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आज शनिवार, 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टी20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा मैदानात उतरतील. मात्र, या मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जखमी झाला. सरावादरम्यान सिराजला दुखापत झाली.
दरम्यान, ही मालिका अनेक गोष्टींंसाठी खास मानली जात आहे. या मालिकेपासूनच सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा पूर्णवेळ टी20 कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. तसेच गाैतम गंभीरचीही हेड कोच म्हणून पहिलीच मालिका आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासात नव्या पर्वाला सुरुवात आहे असे बोलले जात आहे.
पहिला टी20 सामना कधी आणि कुठे होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा पहिला टी20 सामना शनिवार, 27 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टी-20 मालिकेतील तीनही सामने केवळ पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 29 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने 19 जिंकले, तर श्रीलंकेला फक्त 9 जिंकता आले. दोघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका जानेवारी 2023 मध्ये खेळवण्यात आली होती. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर भारताने घरच्या भूमीवर मालिका खेळली. यावेळी ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक) हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रियान पराग, खलील अहमद
टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ
चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महेश थिक्षाना, दिलशान मदुशांका, मथिशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, दिनेश चंदला, कुसल चंदल, कुसल चंदल, कुसल मेंडिस , चामिंडू विक्रमसिंघे
हेही वाचा-
महिला आशिया कप 2024: श्रीलंकेची फायनलमध्ये थाटात एंट्री; उपांत्य फेरीत पाकिस्तानला पाजलं पाणी
“तू खालच्या दर्जाचा माणूस…”, हरभजनवर टीका करताना पाकिस्तानी खेळाडूची जीभ घसरली
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित