भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि या स्टेडियमचे एक खास नाते आहे. आगच्या आयपीएल हंगामापर्यंत विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) नेतृत्व केले होते आणि आगामी हंगामातही तो याच संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशात बेंगलोरमध्ये विराटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. याचाच प्रत्यय श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्याच्य पहिल्याच दिवशा आला.
शनिवारी (१२ मार्च) सामन्याच्या पहिल्या दिवशी विराटसाठी बेंगलोरमधील चाहत्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. भारतीय संघाचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्याच दिवशी संपला. त्यानंतर संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला, तेव्हा विराटच्या नावाने चाहते नारेबाजी करू लागले. यादरम्यान विराटने पांढऱ्या रंगाची भारतीय संघाची जर्सी वर केली आणि आतमध्ये घातलेली लाग रंगाची जर्सी चाहत्यांना दाखवली. आरसीबीची जर्सीही लाल रंगाची असल्यामुळे विराटनेही त्यांना त्याने घातलेली लाल जर्सी दाखवली.
दक्षिण अफ्रिकी दिग्गज एबी डिविलियर्स (AB De Villers) याने मागच्या आयपीएल हंगामानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डिविलियर्स आरसीबीचा एक महत्वाचा आणि प्रचंड लोकप्रिय असलेला खेळाडू होता. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांना शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटच्या नावासह डिविलियर्सच्या नावाचेही नारे दिले. विराट कोहली (Virat Kohli) आणि डिविलियर्स या दोन दिग्गजांनी अनेक वर्षी आरसीबीसाठी एकत्र क्रिकेट खेळले.
https://twitter.com/AvinashBatwara4/status/1502660724757512193
सामन्याचा विचार केला, तर पहिल्याच दिवशी मैदानात १६ विकेट्स पडल्या. फलंदाजीसाठी अनुकूल सांगितल्या गेलेल्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी भारतीय संघाने श्रीलंकेपेक्षा सरस कामगिरी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघाने २५२ धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. श्रेयस अय्यर (९२) एकमेव खेळाडू ठरला जो अर्धशतकी खेळी करू शकला. विराट कोहलीने २३ धावा करून स्वतःची विकेट गमावली.
https://twitter.com/amithapj/status/1502653246975873025
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंका संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८६ धावा केल्या आणि तब्बल ६ महत्वाच्या विकेट्स गमावल्या आहेत. भारतीय संघ सध्या श्रीलंकेपेक्षा १६६ धावांनी आघाडीवर आहे आणि श्रीलंकेचा हातात अजून ४ विकेट्स खेळ बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये २ कर्णधार विदेशी, तर ८ संघांच्या नेतृत्वाची कमान भारतीय खेळाडूंकडे; पाहा यादी
‘मॅचविनिंग’ शतकानंतर स्मृतीने दिली ‘त्या’ गोष्टीची प्रांजळ कबुली
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!