भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतली पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला होता. उभय संघातील दुसरा सामना बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे, जो शनिवारी (१२ मार्च) दुपारी सुरू झाला. दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असून गुलाबी चेंडूने खेळला जाईल. दरम्यान या कसोटीपूर्वी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने रोहित शर्माच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या साकारली होती. यामध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या ९६ धावांचे मोलाचे योगदान होते. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची मुलगी समायरासोबत चित्र काढताना दिसत आहे.
रिषभ पंतने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून समायरासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत पंत समायरासोबत एका पानावर चित्र काढत आहे. चाहते पंतच्या या इंस्टाग्राम पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाइक्स करत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये पंतने रोहितची पत्नी रितिकाला टॅग करून ‘कॅप्शन पाहिजे’ असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/Ca9_WA-pne-/
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या होत्या. यामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वात मोठी १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याव्यितिरिक्त रिषभ पंत या सामन्यात भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने ९७ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याच्या ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
दरम्यान, दुसरा कसोटी सामना बेंगलोरमध्ये खेळला जाणार असून त्याठिकाणी मैदानात १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली आहे. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २०१८ नंतर खेळला जाणारा हा पहिला कसोटी सामना आहे. तसेच या स्टेडियमवर २०२० मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताने ती मालिका जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या –






