---Advertisement---

‘तो सर्व सोन्यात बदलतोय’, मास्टर-ब्लास्टरनेही घेतली जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीची दखल

On: सोमवार, मार्च 7, 2022 11:41 AM
Sachin-Tendulkar-Ravindra-Jadeja
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन दिवसांमध्ये निकाली निघाला. हा सामना शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाला होता आणि रविवारी (६ मार्च) भारताने विजय मिळवला. या विजयात भारताचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे योगदान बहुमूल्य राहिले. आता जडेजाच्या याच महत्वाच्या प्रदर्शनासाठी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि २२२ धावांनी विजयी ठरला आहे.

उभय संघातील हा पहिला सामना मोहालीमध्ये खेळला गेला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५७४ धावा केल्या. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्या डावात १७५ धावा करून नाबाद राहिला. त्याचे द्विशतक होऊ शकत होते, पण संघाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात ५, तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या.

दरम्यान भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून जडेजाचे कौतुक केले आहे. सचिनने ट्वीटमध्ये लिहिले की, “रवींद्र जडेजा सर्व गोष्टी सोन्यामध्ये बदलू लागला आहे. अप्रतिम प्रदर्शन”

https://twitter.com/sachin_rt/status/1500353512282091521?s=20&t=aStU44-og6myx2lfV88a5Q

रवींद्र जडेजाने केकेल्या नाबाद १७५ धावा त्याने १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. जडेजा ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात भारतीय संघासाठी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पहिल्या डावात भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात श्रीलंका संघ १७८ धावा करून पुन्हा एकदा स्वस्तात सर्वबाद झाला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून बंगळुरुमध्ये खेळला जाईल. हा सामना दिवस-रात्र स्वरुपाचा असून गुलाबी चेंडूने खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या –

माही वे! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होताच धोनीने सुरू केला सराव; फोटो होतोय जोरदार व्हायरल

जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत

आयपीएल २०२२मध्ये ‘या’ ३ परदेशी खेळाडूंना मिळू शकते दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---