---Advertisement---

IND vs USA: सूर्यकुमार यादवच्या जोरावर भारत 161 धावांपर्यंत; टॉप ऑर्डरकडून पुन्हा निराशा

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 9:02 PM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. पॉवरप्ले मध्येच भारताचे चार विकेट पडले होते, मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 84 धावांची जबरदस्त खेळी केली. अमेरिकेकडून शॅडली वान शल्कविकने 3 विकेट्स घेतल्या.

अमेरिकेविरुद्ध प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. अली खानने त्याला बाद केले. ईशान किशनने 16 चेंडूत 20 धावा केल्या, तर ईशान आणि तिलक वर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 24 चेंडूत 37 धावांची भागीदारी झाली. तिलक वर्मा 16 चेंडूत 25 धावा करून बाद झाला, तर शिवम दुबे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

अमेरिकेच्या गोलंदाज शॅडली वान शल्कविकने सहाव्या षटकात तीन विकेट्स घेत भारताला मोठा धक्का दिला. रिंकू सिंग 14 चेंडूत 6 धावा करून बाद झाला, तर हार्दिक पांड्याला केवळ 6 चेंडूत 5 धावाच करता आल्या. अक्षर पटेलने 11 चेंडूत 14 धावा केल्या. अर्शदीप सिंगने 6 चेंडूत 4 धावा केल्या, तर वरुण चक्रवर्ती रनआऊट झाला.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन-

भारत- ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.

अमेरिका- मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रीज गौस (यष्टीरक्षक), सैतेजा मुक्कमल्ला, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शुभम रंजन, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसिन, अली खान, नोस्टुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली व्हॅन शाल्कविक, शेहान जयसूर्या, जसदीप सिंग, संजय कृष्णमूर्ती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---