आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताचा अमेरिकेविरुद्ध (USA) सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असून, अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल आहे. विशेष म्हणजे मोनांक पटेल याचा जन्म भारतात झाला आहे. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि ईशान किशन सलामीला मैदानात उतरणार आहेत. मात्र, जसप्रीत बुमराह आजारी असल्यामुळे या सामन्यात खेळत नाहीये. तसेच संजू सॅमसनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मोहम्मद सिराज आजचा सामना खेळत असून, त्याच्या समावेशामुळे भारतीय वेगवान माऱ्याला बळ मिळाले आहे.
याआधी 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही भारत आणि अमेरिकेचा सामना झाला होता. त्या वेळी भारताने सहज विजय मिळवला होता. मात्र, यंदा अमेरिका भारताला किती टक्कर देऊ शकते, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागले आहे. सामना जसजसा पुढे जईल, तसतशी रंगत वाढत जाणार आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन-
भारत- ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
अमेरिका- मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रीज गौस (यष्टीरक्षक), सैतेजा मुक्कमल्ला, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शुभम रंजन, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसिन, अली खान, नोस्टुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली व्हॅन शाल्कविक, शेहान जयसूर्या, जसदीप सिंग, संजय कृष्णमूर्ती.






