---Advertisement---

IND vs WI : वनडे मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर

IND-vs-WI
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 2 सामन्यांची कसोटी आता संपली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला यजमानांना व्हाईटवॉश देता आला नाही. त्यामुळे भारताने मालिका 1-0 अशी जिंकली. अशात या मालिकेनंतर उभय संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. गुरुवारी (दि. 27 जुलै) पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथे खेळला जाणार आहे. चला तर, या सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ गुरुवारी 3 सामन्यांची वनडे मालिका आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरेल. कसोटीप्रमाणे वनडेतही भारतीय संघाचे वेस्ट इंडिज संघावर दीर्घ काळापासून वर्चस्व राहिले आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध अखेरची वनडे मालिका 2006मध्ये जिंकली होती. तेव्हापासून भारताना विंडीजविरुद्ध सलग 12 वनडे मालिका जिंकल्या आहेत. अशात त्यांच्या निशाण्यावर सलग 13वी वनडे मालिका असणार आहे.

भारतात पार पडणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात विंडीजला अपयश आले होते. मात्र, आता त्यांना वनडे क्रिकेटमधील खेळात पुन्हा सुधारणा करावी लागणार आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) उभय संघात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडिअममध्ये तिसरा वनडे सामना खेळला जाईल.

सामन्याविषयी सर्वकाही
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील पहिला वनडे सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) रोजी खेळला जाईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होईल. या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेत सामन्याचे प्रक्षेपण होईल. तसेच, फ्री डीटीएचवरही हा सामना पाहता येईल.

याव्यतिरिक्त जिओ सिनेमा आणि फॅनकोड या ऍप आणि वेबसाईटवरही भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना पाहता येईल. जिओ सिनेमावर हा सामना मोफत पाहता येईल. तसेच, फॅनकोडसाठी ठरावीक रक्कम भरावी लागेल.

वनडे मालिकेसाठी उभय संघ

वेस्ट इंडिज-
शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), ऍलिक अथानाजे, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काईल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉम.

भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार (ind vs wi 1st odi 2023 live streaming telecast channel where how to watch west indies vs india know all here)

महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफी: दक्षिण विभागाचा सलग दुसरा विजय, पश्चिम विभागाच्या पदरी पराभव
वॉर्नर खरंच होणार का निवृत्त? पाचव्या कसोटीआधी स्वतःच दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---