---Advertisement---

देवधर ट्रॉफी: दक्षिण विभागाचा सलग दुसरा विजय, पश्चिम विभागाच्या पदरी पराभव

---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेट हंगामातील दुसरी स्पर्धा देवधर ट्रॉफी सोमवारी (24 जुलै) पॉंडेचेरी येथे सुरू झाली. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन सामने खेळवण्यात आले. दुसऱ्या दिवशी झालेल्या या तीन सामन्यांमध्ये दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा 12 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. याव्यतिरिक्त उत्तर विभाग व पूर्व विभागाने देखील मोठे विजय साजरे केले.

पॉंडेचेरी येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये दक्षिण विभाग व पश्चिम विभाग हे मजबूत संघ समोरासमोर आले. अपेक्षाप्रमाणे हा सामना रंगला. दक्षिण विभागाचा कर्णधार मयंक अगरवाल याने सलग दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करताना 98 धावांची खेळी केली. तरीदेखील दक्षिण विभाग केवळ 206 धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र, विजयासाठी मिळालेल्या 207 या तुटपुंज्या धावांचा पाठलाग करताना पश्चिम विभागासाठी सर्फराज खान व अतित सेठ यांनी संघर्ष केला. परंतु, दक्षिण विभागाच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करताना 12 धावांनी विजय संपादन केला होता.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात उत्तर विभागाने मध्य विभागाचा 48 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रभसिमरन गिल याने ठोकलेल्या शतकानंतर कर्णधार नितिश राणा व मयंक यादव यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर उत्तर विभागाने हा विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात रियान परागच्या चार बळींमुळे पूर्व विभागाने नॉर्थ ईस्टला 169 पर्यंत रोखले होते. त्यानंतर अभिमन्यू ईस्वरन याने नाबाद शतक करत पूर्व विभागाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला

(Deodhar Trophy 2023 South Zone West Zone And North Zone Register Wins)

महत्वाच्या बातम्या –
विराटमुळे संपलं झहीरचं करिअर! इशांत शर्माने सांगितलं 100 कसोटी खेळता न येण्यामागचं कारण
टीम इंडिया स्वीकारणार कॅरेबियन चॅलेंज! पहिल्या वनडेत अशी असेल प्लेईंग 11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---