भारताविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने टी20 मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. उभय संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) पार पडला. हा सामना वेस्ट इंडिजने 4 धावांनी जिंकला. या विजयानंतर कर्णधार रोवमन पॉवेलने प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी म्हटले की, विजयाचा अनुभव चांगला असतो. आमच्याकडे जे काही होतं, आम्ही त्याचा चांगला वापर केला.
रोवमन पॉवेलचे वक्तव्य
भारतीय संघाला पहिल्याच टी20 सामन्यात पराभवाचा धक्का दिल्यानंतर रोवमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने शानदार पुनरागमन केले. विजयानंतर पॉवेल म्हणाला की, “अशाप्रकारे मालिकेतील पहिला सामना जिंकणे एक चांगला अनुभव आहे. जेव्हा आम्ही भारतीय गोलंदाजांना पाहिले, तेव्हा असे वाटले की, आमच्याकडे एक फिरकीपटू आहे. मात्र, आमच्याकडे जे काही होतं, त्याचा आम्हाला चांगला वापर करायचा होता.”
जेसन होल्डरने दिलेला सल्ला
पॉवेलने या सामन्यात 4 षटकात 19 धावा खर्चून 2 विकेट्स घेणाऱ्या जेसन होल्डर (Jason Holder) याचे नाव घेत भाष्यही केले. तो पुढे बोलताना असे म्हणाला की, “मला वाटते की, या मालिकेचा निकाल यावरून ठरेल की, आमचे फलंदाज मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध कशाप्रकारे खेळतात. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. पॉवरप्लेमध्ये फलंदाज धावा करू शकत होते. मात्र, मधळ्या षटकात खेळपट्टी संथ होते. होल्डरने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते शानदार होते. त्याने आम्हा सर्वांना म्हटले होते की, संथ चेंडू टाका.”
वेस्ट इंडिज मालिकेत आघाडीवर
विशेष म्हणजे, वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 149 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवेलने कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारत सर्वाधिक 48 धावा केल्या. विंडीजच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने हा सामना 4 धावांनी नावावर केला. (ind vs wi 1st t20 match skipper rovman powell appreciates jason holder advice during the match)
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रगीतावेळी हार्दिक पंड्याच्या डोळ्यात तरळले अश्रू, कर्णधाराने 140 कोटी भारतीयांनाही केलं भावूक
विंडीजविरुद्ध पहिला टी20 सामना गमावताच पंड्याचे लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘हा युवा संघ आहे त्यामुळे…’