वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (3 ऑगस्ट) पार पडला. त्रिनिदाद येथे झालेल्या या रोमहर्षक सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाने भारताचा 4 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. मोक्याच्या क्षणी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी कामगिरी उंचावत हा विजय साकार केला.
वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्मा (Tilak Varma) एकटाच चमकला. त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 21, तर हार्दिक पंड्याने 19 धावांची खेळी साकारली. भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करू शकला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडीज संघासाठी कर्णधार पॉवेल व निकोलस पूरन यांनी अनुक्रमे 48 व 41 धावा करून 149 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. किंग याने 28 धावांचे योगदान दिलेले. भारतासाठी चहल व कर्णधार हार्दिक यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील दुसरा टी20 सामना 6 ऑगस्ट रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
(West Indies Beat India In 1st ODI Powell Pooran And Shepherd Shines Tilak Varma Batted Well)