भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तीन सामन्यांची टी२० (IND vs WI 1st T20 Series) मालिका सुरु आहे. रोहित शर्माच्या( rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीज संघाला ६ विकेटने पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) टी२० मालिकेचा दुसरा सामना पार पडणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने या मालिकेत ४० धावांची शानदार खेळी खेळण्याबरोबरच संघाचे नेतृत्व करतानाही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून भारतीय संघात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत असून मैदानात सुद्धा खेळाडूंचे विनोदी रुप पाहायला मिळते. मैदानात ते खेळाबरोबरच आनंद घेताना दिसतात. कर्णधार रोहित शर्मा देखील खेळाडूंसोबत अशा गोष्टी बोलतो की त्याच्यानंतर चर्चा होते.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला पुन्हा एकदा बोलला आहे. त्यानंतर चहल चांगलाच ट्रोल होत आहे. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत तो चहलला दात दाखवू नको असे म्हणत आहे.
वेस्ट इंडीजच्या डावाच्या १५ व्या षटकात हा प्रसंग पाहायला मिळाला. १५ वे षटक युझवेंद्र चहल टाकत होता. पहिल्या चेंडूने त्याने पोलार्डला त्रास दिला. पोलार्डने कशीतरी एक धाव काढली आणि नॉन-स्ट्राइककडे आला. यानंतर युझी हसायला लागला. यावेळी स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार रोहित शर्माने चहलला लवकर गोलंदाजी करण्यास आणि दात न काढण्यास सांगितले. स्टंप माइकवर रोहित युझीला बोललेला हे सर्वांनी ऐकले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/theCricketHolic/status/1493963293081309191?s=20&t=jxxkJ2C5JWh42Emq1yj9zw
भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावत १५७ धावा केल्या. वेस्ट इंडीजचा फलंदाज निकोलस पूरनने अर्धशतक झळकावत ६१ धावांची शानदार खेळी खेळली. भारताच्या रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी १८.५ षटकांत ४ गडी गमावत १६२ धावा करत हा सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माने १९ चेंडूत ४० धावा केल्या. इशान किशनने ३५ तर सूर्यकुमारने ३४ धावा केल्या आणि व्यंकटेश अय्यरने २४ धावा केल्या. भारताने या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राडाच ना! रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ११ खेळाडूंचे शतक, तर एका गोलंदाजाची हॅट्रीक
तिघींनी अर्धशतके करून भारतीय महिलांच्या पदरी निराशाच! न्यूझीलंडने जिंकली तिसरी वनडे