IND vs WI: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज, शुक्रवार 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत- यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिजः जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, एलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेज (कर्णधार), टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडन सील्स
Gautam Gambhir and Jasprit Bumrah's reaction when Shubman Gill won the toss. 😂❤️ pic.twitter.com/0111cT2dxD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2025
पहिल्या कसोटीत भारताने डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला होता आणि मालिका 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील दुसरा सामना जिंकून भारत मालिका क्ली-स्वीप करण्याच्या इराद्याने उतरत आहे, तर वेस्टइंडीज समानता साधण्यासाठी शेवटचा प्रयत्न करेल.






