---Advertisement---

WI vs IND | दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट! वाचा कसे असेल हवामान

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 1:47 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. उभय संघात खेळली गेलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने ०-३ अशा अंतराने नावावर केली. त्यानंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना देखील भारताने जिंकला. पहिला टी-२० सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला होता, ज्याठिकाणचे वातावरण साफ होते. अशात आता दुसऱ्या सामन्यात देखील वातावरण अशाच प्रकारे खेळाडूंसाठी अनुकूल असेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. 

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना १ ऑगस्ट (सोमवार) रोजी सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये खेळला जाईल. चाहत्यांना अपेक्षा आहे की, भारतीय संघा या सामन्यात पहिल्या टी-२० सामन्याप्रमाणेच प्रदर्शन करू शकेल. पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजला तब्बल ६८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अर्धशतक ठोकू शकला, तर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने नाबाद ४१ धावांची खेळी केली होती. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या या मालिकेत ०-१ अशा आघाडीवर आहे.

दुसऱ्या सामन्याचा हवामान अंदाज –
दुसऱ्या सामन्यातील वातावरणाचा विचार केला, तर हवामान अंदाजानुसार या सामन्यादरम्यान पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. तसेच आद्रता मध्यम असेल आणि तापमान ३१ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. मैदानातील हवेचा वेग ताशी ३९ किमी एवढा असेल आणि काही प्रमाणात दव पडण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी, सकाळच्या वेळी मैदानात कडक सूर्यप्रकाश असेल, असेही सांगितले गेले आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन – 
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

विंडीज संघाचा रडीचा डाव! सामना जिंकण्यासाठी बदलले ठिकाण? वाचा खरे कारण

‘राष्ट्रकुल’ क्रिडा स्पर्धेचा इतिहास माहितीये?, जाणून घ्या एका क्लिकवर

भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---