---Advertisement---

आनंद गगनात मावेना! टीम इंडियाचे किट मिळताच दीपक हुड्डाकडून आनंद व्यक्त, पाहा फोटो

Deepak-Hooda
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. आधी वनडे मालिका होणार असून या मालिकेसाठी दोन्ही संघ अहमदाबाद येथे पोहोचले आहेत. या सामन्यांची तयारी सुरु झाली आहे. भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी२० संघांची घोषणा आधीच केली आहेत. एकदिवसीय संघात २६ वर्षीय दीपक हुड्डा याचा (Deepak Hooda) सामावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगीरी करणाऱ्या या खेळाडूला भारतीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. गुरुवारी त्याने भारतीय संघाचे कीट मिळाल्याचा आनंद सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

दीपक हुड्डाला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे. दीपकने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून शानदार खेळी कामगिरी केली आहे. तसेच त्याने चांगल्या फलंदाजीबरोबरच आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेकदा महत्त्वाच्या विकेट्स काढल्या आहेत. हुड्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय संघाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. तो खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. त्याला ५७ क्रमांकाची जर्सी देण्यात आली आहे.

सध्या भारतीय संघासाठी कोरोनाचा धोका निर्माण झाला असून शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड हे कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण, याचमुळे दीपकचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ६ फेब्रुवारीला दुसरा सामना ९ आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. त्यानंतर टी२० मालिका खेळवली जाणार आहे. तसेच या मालिकांदरम्यान १२ आणि १३ तारखेला आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल ( उपकर्णधार ), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर,आवेश खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार.

महत्त्वाच्या बातम्या – 

विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत होणार द्रविड – रोहितच्या नव्या अध्यायला सुरुवात, बीसीसीआय अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी

कॅरेबियन असूनही विवेकानंदांचे पुस्तक हाती घेत गेलने दाखवले भारतावरचे प्रेम, फोटो तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---