---Advertisement---

WIvsIND: टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानचा करणार खेळखंडोबा! वाचा काय आहे समीकरण

Shikhar-Dhawan-Rahul-Dravid
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) खेळला जाणार आहे. त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियम येथे हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत १-० असा पुढे आहे. हा सामना जिंकला तर भारत मालिका जिंकलेच त्याबरोबरच मोठा पराक्रम नावावर करण्याची संधीही आहे. ही मालिका भारत शिखर धवन (Shikhar Dhawan)याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकला तर भारत पाकिस्तानला मागे टाकत एकाच संघाविरुद्ध लागोपाठ वनडे मालिका जिंकण्याचा हा विश्वपराक्रम नावावर करण्याची संधी आहे.

भारतासोबत पाकिस्तान पहिल्या स्थानावर

एका संघाविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक वनडे मालिका जिंकण्याचा विक्रम भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या नावावर आहे. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध लागोपाठ ११ वनडे मालिका जिंकल्या आहेत. याची सुरूवात २००७मध्ये झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने झिम्बाब्वे विरुद्ध लागोपाठ ११ वनडे मालिका जिंकल्या आहेत. यामुळे भारताला दुसरा वनडे सामना जिंकत पाकिस्तानला मागे टाकत पहिल्या स्थानावर आपले हक्क दाखवण्याची संधी आहे.

२००६ भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिका

भारतीय संघ २००६च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ वनडे सामने खेळला. या दौऱ्यात राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसरा सामना १ धावेने सामना गमावला आहे. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी २ धावा पाहिजे होत्या, मात्र ड्वेन ब्रावोने युवराज सिंग (Yuvraj Singh) याला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर भारताने तिन्ही सामने गमावले होते. ही मालिका भारताने ४-१ अशी जिंकली होती. त्यानंतर या द्विपक्षिय मालिकेत भारताचेच वर्चस्व राहिले आहे.

एका संघाविरोधात लागोपाठ वनडे मालिका जिंकणारे संघ (कमीत कमी ३ सामने)

संघ                           विरोधी संघ            मालिका विजय         कधीपासून

भारत                         वेस्ट इंडिज             ११*                      २००७ पासून
पाकिस्तान                  झिम्बाब्वे                ११*                       १९९६
पाकिस्तान                  वेस्ट इंडिज             १०*                      १९९९
दक्षिण आफ्रिका          वेस्ट इंडिज               ९*                      १९९५
भारत                         श्रीलंका                   ९*                      २००७

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारण्यासाठी धवन लढवणार शक्कल, प्लेइंग Xiमध्ये करणार ‘हा’ बदल

मॅच विनिंग प्रदर्शनानंतर सिराजने सांगितला त्याचा शेवटच्या षटकातील प्लॅन, असा वाचवला सामना

भारतीय संघाच्या विजयाचा आनंद द्विगुणित, लाराला अचानक ड्रेसिंग रूममध्ये पाहताच धवनचे आलिंगन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---