---Advertisement---

‘मैं फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा’, रोहितचं कौतुक करताना पंजाब किंग्जचा राहुलला अप्रत्यक्ष टोला

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 6:21 PM
KL Rahul and Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यात सध्या मायदेशातील एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिका आयोजित केली गेली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा (rohit sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन करत विजय मिळवला आणि मालिकाही नावावर केली. आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जने (punjab kings) रोहित शर्माचे कौतुक करण्यासाठी एक ट्वीट केले आहे, जे चाहत्यांमध्ये व्हायरलही झाले आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका नावावर करण्यापूर्वी भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, तर एकदिवसीय मालिकेत रोहित अनुपस्थित असल्यामुळे केएल राहुलने कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. अशात रोहितने संघात जबरदस्त पुनरागमन करत मालिका नावावर केली आहे.

सध्या सर्वत्र एपी ढिल्लो (AP Dhillon) आणि गुरिंदर गिल (Gurinder Gill) यांचे ‘एक्सक्यूज’ हे पंजाबी गाणे व्हायरल होत आहे. पंजाब किंग्जने रोहितच्या कौतुकात केलेल्या ट्वीटमध्येही याच गाण्याच्या लिरिक्स वापरल्या आहेत. आयपीएल फ्रेंचायझीने ट्वीटमध्ये लिहिले की, “मै फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा.” सोबतच ट्वीटमध्ये लिहिले आहे की, रोहितने नेतृत्वाचा अप्रतिम नमुना सादर केला आहे.

ढिल्लो आणि गुरिंदर यांचे हे गाणे इंस्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मीडिया माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. लोक या गाण्यावर वेगवेगळ्या रिल्स आणि मीम्स तयार करत आहेत.

पंजाब किंग्जच्या या ट्वीटनंतर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या हंगामात केएल राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता. परंतु पुढच्या हंगामापूर्वी राहुलने संघाची साथ सोडली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याने खराब नेतृत्व केले. अशात चाहते असा अंदाज व्यक्त करत आहेत की, पंजाब किंग्जने रोहितच्या कौतुकात केलेले हे ट्वीट एकप्रकारे राहुलवर निशाणा आहे. तर काही चाहत्यांच्या मते या ट्वीटमधून पंजाब संघाने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल लिलावात प्रसिद्ध होणार ‘कृष्णा’! ‘या’ चार संघांची असणार करडी नजर

भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…

विराटने भन्नाट झेल टिपल्यानंतर ‘हिटमॅनने’ दिलेली रिॲक्शन सोशल मीडियावर होतेय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---