बुधवारी (१६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी२० सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईसाठी हा पदार्पणाचा सामना होता आणि त्याने चांगले प्रदर्शन करून दाखवले. परंतु भारताच उत्कृष्ट फलंदाज श्रेयस अय्यर (shreyas iyer) याला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. सामन्यातील भारतीय संघाच्या (team india) प्रदर्शनासोबतच भारताची प्लेइंग इलेव्हन चर्चेचा विषय ठरला. कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) श्रेयसला संधी न मिळण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
रवी बिश्नोईने त्याच्या या पदार्पण सामन्यात २ विकेट्स घेतल्या आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहितला प्लेइंग इलेव्हन आणि श्रेयस अय्यरविषयी प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना रोहित सांगितेल की, “संघाला सध्या मध्यक्रमात एका चांगल्या अष्टपैलूची गरज आहे त्यामुळे वेंकटेश अय्यरला (venkatesh iyer) संघात संधी दिली गेली.
रोहित म्हणाला की, “श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूला बाहेर बसावे लागत आहे. हे खूप कठीण आहे. पण संघाच्या गरजेप्रमाणे निर्णय घेतला गेला. आम्हाला मध्यक्रमात अष्टपैलूची गरज आहे. संघात यासाठी चांगली स्पर्धा आहे. आम्ही श्रेयसला सांगितले आहे की, विश्वचषकापूर्वी संघाला एका अष्टपैलूची गरज आहे. सर्व खेळाडू समजूतदार आहेत. त्या सर्वांना माहिती आहे की, संघापेक्षा अधिक महत्वाचे काहीच नाहीये.”
“प्लेइंग इलेव्हनची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. विरोधी संघ, परिस्थिती, मैदानाचा आकार, अशा गोष्टी. अनेकदा बाहेर बसणाऱ्या खेलाडूंसाठी ही खूप कठीण गोष्ट असते, पण आम्ही स्पष्ट संदेश देतो. आम्हाला संघ सर्वात आधी ठेवायचा आहे.” असे रोहित पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, पहिल्या टी-२० सामन्यात भारताला मिळालेल्या विजयात मध्यक्रमातील फलंदाजांचे योगदान राहिले. सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी मध्यक्रमात ४८ धावांची महत्वाची भागीदारी केली आणि विजय मिळवून दिला. मध्यक्रमात संधी मिळवण्यासाठी श्रेयस अय्यरपुढे सूर्युकमार आणि वेंकटेश या दोन खेळाडूंचे आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
“आयपीएल जवळ आल्यावर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी प्रयत्न करतात”
श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात का मिळाली नाही जागा? रोहितकडून खुलासा
कमी किमतीत विकले गेलेले ‘हे’ खेळाडू ठरु शकतात आयपीएलमध्ये ‘गेमचेंजर’