वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारताने पहिल्या १४ षटकात अवघ्या ९३ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादव या जोडीने शेवटच्या ४ षटकात तब्बल ८६ धावा साकारल्या आणि संघाची धावसंख्या १८४ पर्यंत घेऊन गेले. सुर्यकुमार आणि वेंकटेश यांच्यात ९१ धावांची भागिदारी झाली. भारताच्या विजयात सूर्यकुमारने ३१ चेंडूत ६५ धावा करून महत्वाचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या १ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

तत्पूर्वी, सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या आणि विरोधी संघाला विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडीज संघ प्रत्युत्तरात २० षटकांमध्ये १६७ धावांपर्यंत पोहचू शकला आणि भारताने १७ धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या हा तिसरा टी-२० सामना जिंकण्यापूर्वी भारताने आधीचे दोन टी-२० सामने देखील जिंकले होते. अशा प्रकारे टी-२० मालिकेत वेस्ट इंडीजला भारताकडून क्लीन स्वीप (३-०) मिळाला. टी-२० मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजला एकही सामना जिंकता आला नव्हता. एकदिवसीय मालिकेत देखील भारताने ३-० असा विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या – 

रोहित ठरला विराट-धोनीला भारी; भारतात केली कोणालाही न जमलेली कामगिरी

वृद्धीमान सहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही, बीसीसीआय करू शकते कारवाई

भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’