क्रिकेटटॉप बातम्या

काय राव! बड्डे ईशानचा आणि रोहितने मागितले गिफ्ट, म्हणाला, ‘तूच टीम इंडियासाठी…’

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला होता. मंगळवारी (दि. 18 जुलै) भारतीय संघाच्या खेळाडूंनी सराव सामन्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याचा वाढदिवसही साजरा केला. अशात बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात कर्णधार रोहित शर्मा त्याच्याकडून गिफ्ट मागताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

रोहितने ईशानकडे वाढदिवशी संघासाठी मागितले शतक
खरं तर, बीसीसीआयने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ ईशान किशन (Ishan Kishan) याचा वाढदिवस आणि संघाच्या सरावाचा आहे. या व्हिडिओत भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी ईशान केक कापतानाही दिसत आहे. तसेच, ईशानच्या वाढदिवशी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विचारले की, तो ईशानला काय गिफ्ट देणार? यावर रोहित म्हणाला की, “काय पाहिजे भावा? सगळंच तर आहे. तू आम्हाला 100 धावा करून दे.”

खरं तर, कसोटी मालिकेचा पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला गेला होता. हा सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. ईशाननेही याच सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला नाबाद 1 धाव करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय संघाने डाव घोषित केला होता.

रोहित आणि यशस्वी जयसवालचे शतक
मात्र, पहिल्या कसोटीत भारताकडून दोन फलंदाजांनी शतक ठोकले होते. त्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल यांच्या नावाचा समावेश आहे. रोहितने 103 धावा, तर जयसवालने पदार्पणाच्या कसोटीत 171 धावांची शतकी खेळी साकारली होती. अशात मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना त्रिनिदाद (Trinidad) येथील क्वीन्स पार्क ओव्हल (Queens Park Oval) मैदानात खेळला जाणार आहे.

कसोटीनंतर वनडे आणि टी20 मालिका
कसोटी मालिका संपल्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे, तर टी20 मालिकेतील पहिल्या सामना 3 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. या दौऱ्याचा अखेरचा सामना 13 ऑगस्ट रोजी पार पडेल. (ind vs wi young cricketer ishan kishan birthday rohit sharma wanted this gift for team india)

महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजच्या घसरणाऱ्या स्तराविषयी भारतीय कर्णधाराला सवाल, रोहित काय म्हणाला लगेच वाचा
तारीख ठरली! Asia Cup 2023मध्ये Team India ‘या’ दिवशी ठेचणार पाकिस्तानच्या नांग्या, लगेच वाचा

Related Articles