---Advertisement---

विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार

Yuzvendra-Chahal-Straight-Drive
---Advertisement---

अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. बुधवारी (9फेब्रुवारी) या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर ४४ धवांनी विजय मिळवला आणि सामन्यात २-० अशी आघाडी मिळवली. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी भारतीय फलंदाजांमध्ये शानदार खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देण्यास चमकदार कामगिरी केली. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज युझवेंद्र चहल हा या सामन्यात त्याच्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीमुळे चर्चेत राहिला.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेवटच्या षटकात युझीने फलंदाजी केली. २३७ धावांमध्ये युझवेंद्र चहलने ११ धावांचे योगदान दिले आणि या दरम्यान त्याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, ज्यामुळे त्याने चार धावा काढल्या.

संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणारा अल्झारी जोसेफने डावातील शेवटचे ५० वे षटक टाकले. यावेळी चहल समोर स्ट्राइकवर होता. अशा परिस्थितीत जोसेफच्या वेगवान चेंडूला घाबरण्याऐवजी चहल बेधडकपणे स्ट्रेट ड्राईव्ह खेळताना दिसला, ज्यावर त्याने चौकार मारला. त्याच्या या खेळीचे जोरदार कौतुक केले जात आहे. चहलचा चौकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने गोलंदाजीतही एक गडी बाद केला. पण आज सर्वांचे लक्ष चहलच्या फलंदाजीवर लागले होते.

वेस्टइंडीजचा हा वर्षातील दुसरा एकदिवसीय मालिकेतील पराभव आहे. या आधी आयर्लन्डने त्यांचा मायदेशात १-२ असा पराभव केला होता.

दरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने ६४ आणि केएल राहुलने ४९ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा फक्त ५ धावा करू शकला. सलामीवीर रिषभ पंतने आणि विराट कोहलीने १८ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने २४ तर दीपक हुडाने २९ धावा केल्या. शार्दुल ठाकुरने ८ धावा तर मोहम्मद सिराजने ३ धावा केल्या आणि युझवेंद्र चहलने नाबाद ११ धावा केल्या आणि भारताला २३७ धावा करण्यास मदत केली. वेस्ट इंडिज संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. भारताने या सामन्यात विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या ‘त्या’ २ कंजूष वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला प्रसिद्ध कृष्णा, केलाय लई भारी पराक्रम

जॉर्ज ऑर्टिझची हॅटट्रिक, एफसी गोवानं मिळवला चेन्नईयनवर मोठा विजय!

…फ्लॉवर समझे क्या, फायर हैं मैं! ‘सामनावीर’ कृष्णाने विंडीज फलंदाजांला दाखवले डोळे, ५ सेकंद चालला वाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---