भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत झिम्बाब्वे विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यात खेळणार आहे. दुखापतीमुळे तो काही महिने संघात उपस्थित नव्हता, यामुळे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात शिखर धवनने कर्णधारपद सांभाळले होते. झिम्बाब्वे दौऱ्यात पहिले भारताचा कर्णधार म्हणून धवनला नियुक्त केले होते, मात्र राहुल फिट होऊन संघात परतल्याने त्याला कर्णधार केले आहे. पहिल्यांदा त्याने झिम्बाब्वेचा दौरा केला होता तो त्याच्यासाठी विशेष ठरला.
केएल राहुल (KL Rahul) याने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये (एनसीए) फिटनेस टेस्ट पार केल्यानंतर तो झिम्बाब्वेला पोहोचला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामानंतर राहुल दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे तो अनेक महत्वाच्या मालिकांना मुकला होता. तो जेव्हा संघात नव्हता तेव्हा शिखर धवन (Shikhar Dhawan)याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात वनडे मालिकेसाठी कर्णधार केले होते. राहुल हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील टी२० मालिकेत खेळणार होता, मात्र तो कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने त्या मालिकेतही तो खेळला नाही. आता झिम्बाब्वे दौऱ्यात तो हरारे येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. यातील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळला जाणार आहे.
राहुलने २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय वनडेत पदार्पण केले होते. त्याने ११ जून २०१६ला हरारे येथे खेळलेल्या सामन्यात तो भारताच्या अंतिम अकरामध्ये होता. या सामन्यात झिम्बाब्वेने सर्वबाद १६८ धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक असे ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच धवल कुलकर्णी आणि बरिंदर स्रान यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या होत्या.
पदार्पणाच्या सामन्यातच राहुलची नाबाद शतकी खेळी
झिम्बाब्वे विरुद्धच्या त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलने नाबाद शतकी खेळी केली होती. हा सामना भारताने ९ विकेट्सने जिंकला होता. सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना राहुलने ११५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार मारत १०० धावा केल्या. करूण नायर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अंबाती रायुडूने नाबाद ६२ धावा केल्या होत्या. तीन सामन्यांची ही वनडे मालिका भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना ३-० अशी जिंकली होती.
Displaying his 𝐊𝐋ass since game 1️⃣
Can @klrahul continue his 🔝 form in the ODI series against 🇿🇼? 🤞
Watch #ZIMvIND LIVE action only on #SonySportsNetwork 📺 from 18th August 🏏#SirfSonyPeDikhega pic.twitter.com/hI3iXVByEF
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 13, 2022
राहुल २०१६नंतर आता झिम्बाब्वेचा दौरा करत आहे. यावेळी तो संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच त्याने मोठ्या कालावधीनंतर तो भारतीय संघात परतल्याने त्याच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
अल्टिमेट खो-खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची विजयाची हॅट्रिक, मुंबई खिलाडीजवर सलग दुसऱ्यांदा मात