भारताविरुद्ध सुरू असलेल्या महिला वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका आधीच जिंकली आहे. दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत अवघ्या 100 धावांवर ऑल आऊट झाला आणि दुसऱ्या वनडेत 370 हून अधिक धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. टीम इंडियाने ही मालिका गमावली असली तरी शेवटची वनडे जिंकण्यासाठी ते उत्सुक असतील. टीम इंडियाला या सामन्यात क्लीन स्वीप टाळायचा आहे. हा सामना आज 11 डिसेंबर रोजी पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन (WACA) मैदानावर होणार आहे.
दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. जॉर्जिया वॉल आणि एलिस पेरी यांनी शतके झळकावली. तर सलामीवीर फोबी लिचफिल्डने 63 चेंडूत 60 धावा केल्या. बेथ मुनीनेही 56 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 371 धावा केल्या. भारतासाठी रिचा घोषने चांगली सुरुवात केली. पण चौथ्या षटकात स्मृती मानधना बाद झाली. हरलीन देओल केवळ 12 धावा करून बाद झाली. मधल्या फळीत, हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी काहीशी झुंज दिली. पण दोघेही अनुक्रमे 38 आणि 53 धावांवर बाद झाले. मिन्नू मणी 44 धावांवर नाबाद राहिली. पण भारत 122 धावांनी लक्ष्यापासून मागे राहिला. परिणामी भारताचा वाईटरित्या पराभव झाला.
भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला तिसरा एकदिवसीय सामना 11 डिसेंबर रोजीपर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन (WACA) मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रवाह भारतातील (Disney+ Hotstar) वर उपलब्ध असेल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जाईल. टॉसची वेळ सकाळी 9:20 वाजता आहे. उभय संघांमधील रोमांचक सामन्याची चाहत्यांना अपेक्षा आहे.
हेही वाचा-
या गोलंदाजासमोर बुमराह शमीही फेल, अशी कामगिरी करणारा जगातील केवळ चौथा बाॅलर
SA VS PAK; कर्णधार रिझवानची संथ खेळी, बाबर आझम पुन्हा फेल, पाकिस्तानचा निसटता पराभव
BAN vs WI; टी20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा!






