---Advertisement---

जस्ट ब्युटीफुल!! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या चेंडूवर स्म्रीतीचा कडक ‘पुल शॉट’, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 10:38 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघांमध्ये क्विन्सलँडच्या द करारा ओव्हल स्टेडियमवर एकमेव गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळला जात आहे. गुरुवात (३० सप्टेंबर) पासून सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या पारड्यात पडल्याने त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. परंतु भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. त्यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी रचली.

यादरम्यान भारताची फलंदाज स्म्रीती हिने काही अप्रतिम फटके खेळत सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. त्यातही तिचा पुल शॉट सर्वांचे आकर्षण ठरला. 

ऑस्ट्रेलियाची मध्यमगती गोलंदाज ताहलिया मॅकग्राथ हिच्या चेंडूवर स्म्रीतीने हा शॉट खेळला. डावातील ४२ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मॅकग्राथच्या सहाव्या चेंडूला हलक्या हाताने सीमारेषेबाहेर टोलवले. तिने अगदी सहजपणे बॅट भिरकावत हा शॉट खेळला आणि चेंडूने सरळ सीमारेषा पार केली. तिच्या या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

विशेष म्हणजे, स्म्रीतीने याच मॅकग्राने टाकलेल्या डावाच्या ४० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला होता. त्यामुळे ती ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत षटकार ठोकणारी जगातील केवळ दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी असा विक्रम भारताच्याच डायना एडुलजी यांनी केला होता. त्यांनी १९९१ साली मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत षटकार ठोकला होता. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही.

स्म्रीतीने या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली आहे. पावसाचा अडथळा आल्यामुळे या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ अवघ्या ४४.१ षटकांवर थांबवण्यात आला. पहिल्या दिवसाखेर तिने नाबाद ८० धावा जोडल्या आहेत. तब्बल १४४ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने तिने ही धावसंख्या केली आहे.

शेफाली ९३ धावांची भागिदारी करत वैयक्तिक ३१ धावांवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पुनम राऊतने तिला पुरेपूर साथ दिली. तिने दिवसाखेर ५७ चेंडूंमध्ये नाबाद १६ धावा जोडल्या. यासह भारतीय महिला संघ पहिल्या दिवसाखेर ४४.१ षटकात १ बाद १३२ धावा अशा स्थितीत आहे. स्म्रीती अजूनही नाबाद आहे, त्यामुळे ती तिचे शतक पूर्ण करेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला कसोटी क्रिकेट व पुरुष कसोटी क्रिकेटमधील ‘हे’ सात फरक तुम्हाला माहितच हवेत!

AUSW vs INDW: मंधना शतकाच्या जवळ, ऐतिहासिक कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबला

टी२० विश्वचषकाच्या संघातून हार्दिकला वगळले जाणार? ‘या’ कारणास्तव निवडीवर उपस्थित होतायेत प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---